व्यस्त जीवनशैलीमुळे सगळं काही बिघडलेलं आहे. अनेकांना स्वतःसाठी वेळ काढायला जमत नाही. पौष्टिक अन्नाच्या जागी लोकं जंक फूड खाण्यास प्राधान्य देत आहेत. ज्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. ज्यात मुख्य म्हणजे पोटाच्या निगडीत त्रास अधिक वाढतो. अनेकांना रात्री झोपताना अस्वस्थ वाटते. पोट फुगल्यासारखे वाटते. ज्यामुळे नीट झोप देखील लागत नाही. परंतु, रात्रीचं जेवण केल्यानंतर पोट का फुगते? रात्री पोटदुखीचा त्रास का होतो? रात्री पोटात गॅसेस निर्माण झाल्यावर काय करावे? ही प्रश्न साहजिक तुमच्याही मनात येत असतील.
यासंदर्भात, उजाला सिग्नस हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन, डॉ. राजन गांधी यांनी, रात्रीच्या वेळी पोटात गॅसेस निर्माण होण्यामागची कारणं, व त्यावर काही उपाय सांगितले आहेत(Gas at night: Causes, treatment, and prevention).
रात्री पोटात गॅस तयार का होते?
- आपण जर रात्रीच्या वेळी पोट गच्च भरून जेवत असाल तर, गॅसेसचा त्रास हमखास होणार. त्यामुळे रात्रीच्या वेळी हलका आहार घ्यावा, व पोट भरून जेवण करू नये. यामुळे पचनसंस्थेवर ताण पडू शकतो.
रात्रीचे जेवण बंद केल्यानं खरंच वेटलॉस होतो? जेवण बंद करुनही वजन वाढले तर?
- जर आपण रात्री हाय फायबर फुड्स जसे की, बीन्स, मटार, ब्रोकोली, केळी, सफरचंद, एवोकॅडो खात असाल तर, गॅसेसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी हाय फायबर फुड्स खाणे टाळा.
रात्री पोटात गॅस होऊ नये म्हणून काय करावे?
- डिनर झाल्यानंतर नियमित २५ मिनिटे शतपावली करावी. असे केल्याने आरोग्याला विविध फायदे मिळतात. यासह अन्न पचण्यात कोणतीही अडचण येत नाही. जर आपल्याला चांगली झोप हवी असेल तर, जेवण केल्यानंतर शतपावलांची सवय लावा.
- कधी-कधी कमी पाणी प्यायल्यानेही रात्री गॅसेसचा त्रास निर्माण होऊ शकते. जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. अर्ध्या तासाने दोन ग्लास पाणी प्यावे. व शतपावली करून झोपावे. यामुळे गॅसेसचा त्रास होणार नाही.
दही-कांदा एकत्र खावा का? दह्यात कांदा घालून खाल्ला तर पचन बिघडतं की सुधारतं?
- रात्रीचे जेवण केल्यानंतर एका जागी जास्त वेळ बसू नका, यामुळे गॅसेसची समस्या होऊ शकते. सतत एकाच जागेवर बसल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे सतत हालचाल करत राहावी.