Join us   

गॅसेस,पोट फुगणं, कॉन्स्टीपेशनचा त्रास? ६ उपाय, भूक वाढेल-पचनही सुधारेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 11:47 PM

Gas, bloating problem Solution : उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे काकडी. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ते क्षारीय असते, जे पोटातील आम्ल बेअसर करण्यास आणि आम्लता कमी करण्यास मदत करते.

उन्हाळ्यात कधी कधी खूप भूक लागते पण खाल्लेल्या अन्नाचं वेळेवर पचन होत नाही.  त्यामुळे अजीर्णाचे ढेकर येतात. वेळेवर जेवण अनेकांना शक्य नसतं म्हणूनच दुपारच्या जेवणाला ३ तर कधी चार वाजतात. इतक्या उशीरा दुपारी जेवल्यानंतर अन्न व्यवस्थित पचत नाही.  घामामुळे अस्वस्थ वाटतं. (Gas, bloating problem Solution) 

खाण्यात बाहेरचे पदा्र्थ आले तर अनेकांना गॅसचा त्रास होतो. उन्हाळ्याच्या दिवसात खाणं कमी आणि लिक्विड्सयुक्त पदार्थांचे अधिकाधिक सेवन  करायला हवे.  गरमीच्या दिवसात  छातीत तीव्र ऍसिड तयार होते, अन्न आणि पेय लवकर पचत नाही. डॉ. शुभी राज यांनी सोप्या उपायांनी एसिड रिफ्लेक्सची लक्षणं कमी करण्याच्या टिप्स सांगितल्या आहेत. 

आलं

आल्यात एंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे ऍसिड रिफ्लक्सच्या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करतात. पोट आणि आतड्यांसंबंधी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा चहा किंवा आल्याची कँडी यासारख्या विविध प्रकारांमध्ये सेवन केले जाऊ शकते. आल्याचा चहा प्यायल्यानं सर्दीपासूनही त्वरीत आराम मिळतो.

अननस

जेव्हा खालेल्लं अन्न व्यवस्थित पचत  नसेल तेव्हा तुम्ही अननसाचे सेवन करू शकता.  या फळात ब्रोमेलॅन नावाचे तत्व असते. जे प्रोटीन्स एंजाम्सचे एक संयोजन आहे.  त्यामुळे पोट निरोगी राहते.

एवाकॅडो

या फळामध्ये भरपूर फायबर असते आणि याच कारणामुळे ते पोट आणि आतड्यांमध्ये साठलेला कचरा काढून टाकण्याचे आणि स्वच्छ करण्याचे काम करते. 

बडीशेपेच्या बीया

बडीशेप बिया पोटाचे त्रास शांत करतात आणि पाचक रस आणि एन्झाईम्सच्या उत्पादनास प्रोत्साहन देऊन पचन सुधारतात. म्हणूनच अनेकजण जेवण झाल्यानंतर रोज बडीशेप खातात.

काकडी

उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे काकडी. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि ते क्षारीय असते, जे पोटातील आम्ल बेअसर करण्यास आणि आम्लता कमी करण्यास मदत करते.

कॅमोमाईल चहा

कॅमोमाइल चहामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे ऍसिड रिफ्लक्सची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. झोपण्यापूर्वी एक कप कॅमोमाइल चहा प्या. यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळेल.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य