Join us

जेवल्यावर बडीशेप खाण्याचे असंख्य फायदे; 'या' समस्या होतील दूर, डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:41 IST

अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शरीर त्यावर प्रक्रिया करायला सुरुवात करतं. पचनसंस्थेमध्ये हे सर्व काम होतं, ज्यामध्ये लाळ ग्रंथी, यकृत, लहान आणि मोठं आतडं यासारखे अवयव मुख्य भूमिका बजावतात.

शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक तत्व बहुतेक अन्नाच्या मदतीने मिळतात. अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शरीर त्यावर प्रक्रिया करायला सुरुवात करतं. पचनसंस्थेमध्ये हे सर्व काम होतं, ज्यामध्ये लाळ ग्रंथी, यकृत, लहान आणि मोठं आतडं यासारखे अवयव मुख्य भूमिका बजावतात. यामध्ये जर काही गडबड झाली तर पोट फुगणे, ब्लोटिंग, एसिडीटी, पोटदुखी यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.

सुप्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सेठी यांनी यावर मोलाचा सल्ला दिला आहे. ते यासाठी बडीशेप खाण्याची शिफारस करतात. अलीकडेच, त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, जेवणानंतर बडीशेप खाण्याचे फायदे त्यांनी सांगितले आहेत. मी प्रत्येक जेवणानंतर बडीशेप का खातो? हे मी सांगत आहे. यामुळे ते केवळ पचनास मदत होत नाही तर इतरही अनेक आरोग्यदायी फायदे होतात असं म्हटलं आहे.

ब्लोटिंग होत नाही. 

जास्त किंवा जड जेवण केल्यानंतर ब्लोटिंगची समस्या खूप सामान्य आहे. अशा परिस्थितीत हे टाळण्यासाठी बडीशेपचे सेवन करणं खूप फायदेशीर आहे. हे डायजेस्टिव्ह एंजाइम सोडण्यास मदत करतात, ज्यामुळे अन्नाचं पचन होणं सोपं होतं.

तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम

जर तुम्हाला खाल्ल्यानंतर तोंडाच्या दुर्गंधीची चिंता वाटत असेल तर एक चमचा बडीशेप खाल्ल्याने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. त्यात नैसर्गिक सुगंध आहे.

एसिडिटी होणार नाही

बडीशेप खाल्ल्याने एसिडिटीपासून बचाव आणि आराम दोन्ही मिळतो. हे त्यात असलेल्या अल्कलाईन pH मुळे होतं, जे पचनसंस्थेत चांगलं कार्य करण्यास मदत करतं आणि आराम देतं. ज्यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या होत नाही.

पोटदुखी दूर होते

जर तुम्हाला खाल्ल्यानंतर पोटात वेदना होत असतील, तर बडीशेप हा त्यावरचा नैसर्गिक उपचार आहे. याचे सेवन केल्याने पोटाचे स्नायू रिलॅक्स होतात आणि अन्नपचनाची प्रक्रिया आरामात होते.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य