Join us   

आंबट ढेकर येतात, सतत लाळ गळते? 'या' ४ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका; कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2024 4:13 PM

Gastrointestinal Diseases: Symptoms, Treatment & Causes : मळमळ आणि तोंडाल पाणी सुटते या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर, गंभीर आजार होऊ शकतो..

गॅस्ट्रोइसोफिगल रिफ्लक्स रोग ज्याला 'ॲसिड रिफ्लक्स' असेही म्हणतात (Digestive Disorder). हा एक पोटाचा विकार आहे. पोट आणि अन्ननलिका यांना वेगळे करणारी ‘इसोफिगल स्पिन्सटर’ ही स्नायूची रिंग पोटातील ॲसिड अन्ननलिकेमध्ये जाण्यापासून रोखते (Digestion problem). ही रिंग कमकुवत झाल्यास पोटातील ॲसिड आणि पचनाला सहकार्य करणारे गॅस्ट्रिक ज्युसेस हे ‘इसोफिगस’ म्हणजे अन्ननलिकेकडे येऊ लागतात.

अशा वेळी ‘जीईआरडी’ विकाराची परिस्थिती निर्माण होते. यामुळे इनडायजेशन होऊ शकते. या विकारावर वेळीच उपचार नाही केल्यास समस्या आणखीन वाढू शकते(Gastrointestinal Diseases: Symptoms, Treatment & Causes).

'जीईआरडी'ची लक्षणं कोणती?

'जीईआरडी'च्या लक्षणांमध्ये छातीत जळजळ होणे ही एक प्रमुख लक्षण आहे. साधारणपणे जेवण झाल्यानंतर जळजळ अधिक होते. याशिवाय आंबट ढेकर, छातीत वेदना, अन्न गिळण्यास त्रास, आवाजात कर्कशपणा अशा समस्या निर्माण होतात.

बदाम फक्त मेंदूसाठी नसून, चेहऱ्यावरही करते कमाल; चंद्रासारखी चमक हवी तर, आत्ताच याचा वापर करा

गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स

हा एक पचनाचा विकार आहे. या स्थितीत पोटातील ऍसिड पुन्हा अन्ननलिकेमध्ये येते, ज्यामुळे मळमळ आणि तोंडात जास्त लाळ येऊ शकते.

अल्सर

पोटाच्या अल्सरमुळे मळमळ आणि तोंडाला पाणी येण्याची समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः जेवणानंतर पोटदुखी होते.

आतड्यात जळजळीची लक्षणे

इरिटेबल बोवेल सिंड्रोममुळे देखील मळमळ आणि तोंडाला पाणी येऊ शकते. हा एक आतड्यांसंबधीत समस्या आहे. या कारणामुळे पोटाचे विकार वाढू शकतात.

रोज खा एक 'खजूर'! बळकट हाडं-पोलादी होईल शरीर; रक्ताभिसरण वाढेल - थकवाही होईल दूर

तणाव

जास्त चिंता आणि तणावाचा आपल्या पचनावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे मळमळ आणि तोंडात जास्त लाळ येण्याची समस्या निर्माण होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य