Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > 'या' एका मसाल्यानं बॅड कोलेस्टेरॉल होईल झरझर कमी, जाणून घ्या वापरण्याच्या ४ पद्धती!

'या' एका मसाल्यानं बॅड कोलेस्टेरॉल होईल झरझर कमी, जाणून घ्या वापरण्याच्या ४ पद्धती!

Cholesterol Level : प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, आल्याचा वापर या स्थितीत फायदेशीर ठरू शकतो. कारण यात ट्रायग्लिसराइड आणि लिपोप्रोटीन कमी करणारे गुण आढळतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 12:31 IST2025-01-24T10:19:01+5:302025-01-24T12:31:37+5:30

Cholesterol Level : प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, आल्याचा वापर या स्थितीत फायदेशीर ठरू शकतो. कारण यात ट्रायग्लिसराइड आणि लिपोप्रोटीन कमी करणारे गुण आढळतात.

Ginger can be used in 4 ways to minimize high cholesterol level | 'या' एका मसाल्यानं बॅड कोलेस्टेरॉल होईल झरझर कमी, जाणून घ्या वापरण्याच्या ४ पद्धती!

'या' एका मसाल्यानं बॅड कोलेस्टेरॉल होईल झरझर कमी, जाणून घ्या वापरण्याच्या ४ पद्धती!

How To Use Ginger For High Cholesterol: शरीरात वाढत असलेलं बॅड कोलेस्टेरॉल वेगवेगळ्या समस्या निर्माण करू शकतं. कारण यामुळे हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हार्ट अटॅक, डायबिटीस, कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिजीजसारख्या खतरनाक आजारांचा धोका वाढतो. तसेच शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवरही याचा प्रभाव पडतो. अशात काही घरगुती उपायांच्या मदतीनं बॅड कोलेस्टेरॉल कमी केलं जाऊ शकतं. प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी सांगितलं की, आल्याचा वापर या स्थितीत फायदेशीर ठरू शकतो. कारण यात ट्रायग्लिसराइड आणि लिपोप्रोटीन कमी करणारे गुण आढळतात.

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आले

१) कच्च आले खा

आले थेट खाणंही आरोग्यासाठी अनेक दृष्टीनं फायदेशीर ठरतं. जर तुम्ही तेलकट पदार्थ खाल्ले असतील तर त्यावरून एक तुकडा आले खा. यानं कोलेस्टेरॉल लेव्हल वाढण्याचा धोका कमी  होतो.

२) आल्याचं पावडर

आल्याचं पावडर तयार करण्यासाठी आले काही दिवस उन्हात वाळत घाला आणि नंतर मिक्सरमधून पावडर तयार करा. हे पावडर रोज एक ग्लास पाण्यात टाकून प्याल तर शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होईल.

३) आल्याचं पाणी

आल्याचं पाणीही बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक इंच आल्याचा तुकडा कापून टाका. हे पाणी १५ मिनिटं उकडू द्या आणि नंतर गाळून घ्या. जेवणानंतर हे पाणी प्याल तर शरीराला पाचन रस मिळेल आणि कोलेस्टेरॉलही कमी होईल.

४) आले आणि लिंबाचा चहा

दुधाचा चहा तर तुम्ही अनेक घेतला असेल, पण एकदा नक्की लिंबू आणि आल्याचा चहा ट्राय करायला हवा. खासकरून तेल आणि मसाल्यांचं अधिक सेवन करत असाल बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास हा चहा फायदेशीर ठरतो.

Web Title: Ginger can be used in 4 ways to minimize high cholesterol level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.