सर्दी- खोकला- घसादुखी असा काहीही त्रास होऊ लागला तर आपण ॲण्टीबायोटिक्स घेण्याआधी काही घरगुती उपाय नक्कीच करून बघतो. त्यात जर घसा दुखायला लागला असेल तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या, व्हिक्सच्या गोळ्या किंवा मग हळदीचं दूध असे उपाय आपण घरच्याघरी (best home remedy for dry cough and throat infection) करण्याचा प्रयत्न करतो. काही काही वेळेला तुळस, सुंठ, आलं यांचा काढाही देण्यात येतो...
पण सर्दी- खोकला किंवा घसादुखी अशा दुखण्यांमध्ये काढा किंवा औषध- गोळ्या याऐवजी मस्त चवदार कॅण्डी (how to make ginger honey candy) खायला मिळाल्या तर आहे की नाही झकास बात.. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कॅण्डी लहान मुलं देखील अगदी आवडीने खातील. त्यामुळे एकदा का या कॅण्डी घरात करून ठेवल्या की मग लहान मुलांना सर्दी होते आहे, अशी चाहूल लागताच किंवा घसा खवखवू लागताच, या कॅण्डी चघळायला देऊ शकता. घसादुखी, खोकला यासाठी उपयुक्त ठरणारी ही जिंजर- हनी कॅण्डी कशी बनवायची याची रेसिपी इन्स्टाग्रामच्या masterchefpankajbhadouria या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
कशी बनवायची जिंजर- हनी कॅण्डी ? (how to make ginger honey candy?) - ही कॅण्डी बनविण्यासाठी आपल्याला दोन टेबलस्पून आल्याचा रस, दोन टेबलस्पून मध, अर्धा कप साखर, १ टेबलस्पून लिंबाचा रस आणि थोडंसं तूप लागणार आहे. - सगळ्यात आधी तर आलं किसून घ्या. किसलेलं आलं पिळून त्याचा रस काढून घ्या. - आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवा. - या पॅनवर अर्धा कप साखर टाका. साखर विरघळू द्या.
- साखरेचा पाक झाला की गॅस बंद करा. त्यानंतर त्यात आल्याचा रस, मध आणि साखर टाका. - हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. - एका स्टीलच्या डिशला थोडंसं तूप लावून घ्या. आता आपण तयार केलेलं मिश्रण अगदी थोडं थोडं करून या तूप लावलेल्या डिशमध्ये टाका. - मिश्रण थंड झालं की त्याची कॅण्डीसारखी पातळ चकती तयार होईल. - पुर्णपणे थंड झाल्यावर ही कॅण्डी प्लास्टिकमध्ये गुंडाळून डब्यात ठेवून द्या. - खोकला किंवा घसादुखी असल्यावरच ही कॅण्डी खावी असं काही नाही. तुम्ही रोज जेवण झाल्यानंतर मुखवास म्हणूनही कॅण्डी खाऊ शकता.