Join us   

रक्तवाहिन्या आकुंचन पावल्या, कोलेस्टेरॉल वाढले? ३ उपाय - बदला तुमचे डाएट - दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2023 1:43 PM

Ginger that can help you manage cholesterol levels : बॅड कोलेस्टेरॉलवर आल्याचा तुकडा ठरेल रामबाण उपाय, पाहा याचा वापर

बिघडलेली जीवनशैली, योग्य आहाराचे सेवन न करणे, व्यायामाचा आभाव यामुळे शरीरात अनेक गंभीर आजार निर्माण होतात. शिवाय बॅड कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी देखील वाढते. कोलेस्टेरॉल शरीरासाठी आवश्यक पण, बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढली तर, नसा ब्लॉक होण्याची समस्या वाढते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढू नये म्हणून आपण अनेक उपाय करून पाहतो. जर अनेक उपाय फेल ठरले असतील तर, आल्याचा सोपा-सिंपल उपाय करून पाहा.

आलं बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. यामध्ये जिंजरॉल आणि शोगोल नावाचे अँटीऑक्सिडंट असतात, ज्याच्या मदतीने खराब कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आल्याचा वापर कसा करावा? याने खरंच बॅड कोलेस्टेरॉल कमी होते का? पाहा(Ginger that can help you manage cholesterol levels).

बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आलं कसे खावे?

आलं आणि लिंबू

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, आले आणि लिंबाचा चहा प्यायल्याने बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. शिवाय शरीरातील अतिरिक्त चरबीही घटते. यासाठी एका भांड्यात एक कप पाणी घ्या. त्यात आलं आणि लिंबू घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. चहाच्या गाळणीनी पाणी गाळून घ्या, त्यात मध मिसळून प्या. नियमित हे पेय प्यायल्याने कोलेस्टेरॉलसह वजन देखील कमी होईल.

आला थंडीचा महिना! सर्दी-खोकल्यापासून हैराण झालात? ४ घरगुती सोपे उपाय, छातीतला कफ होईल कमी

रिकाम्या पोटी आलं खा

बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आपण कच्चे आलं चावून खाऊ शकता. आपण हे कच्चे आलं रिकाम्या पोटी चावून खाऊ शकता. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

लसूण आणि आल्याचा काढा

लसूण आणि आलं बॅड कोलेस्टेरॉलची पातळी करण्यास मदत करतात. यासाठी भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात आलं आणि लसूण चेचून घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा, व पाणी गाळून प्या. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी तर कमी होतेच शिवाय, नसा देखील साफ होतील.

४ ‘असे’ पदार्थ, जे सकाळी खाल्ले तर चांगले, पण रात्री खाल्ले तर तब्येत बिघडते, असं का?

पदार्थांमध्ये आल्याच्या पावडरचा वापर करा

जर आपल्याला आलं खायला आवडत नसेल तर, आपण आलं पावडरचा वापर इतर पदार्थांमध्ये घालून करू शकता. यासाठी पदार्थ तयार करताना त्यात चिमुटभर आलं घाला. यामुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, व हृदयरोगाचा धोकाही टळतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य