Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भारतीय महिलांसाठी आनंदाची बातमी! गर्भाशय मुख कॅन्सरवर लवकरच येणार स्वदेशी प्रतिबंधक लस

भारतीय महिलांसाठी आनंदाची बातमी! गर्भाशय मुख कॅन्सरवर लवकरच येणार स्वदेशी प्रतिबंधक लस

India to launch first indigenous vaccine against cervical cancer Serum Institute from pune will launch soon : महिलांना याचा अतिशय फायदा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2022 06:35 PM2022-09-01T18:35:45+5:302022-09-01T18:38:27+5:30

India to launch first indigenous vaccine against cervical cancer Serum Institute from pune will launch soon : महिलांना याचा अतिशय फायदा होणार

Good news for Indian women! Indigenous vaccine against cervical cancer coming soon | भारतीय महिलांसाठी आनंदाची बातमी! गर्भाशय मुख कॅन्सरवर लवकरच येणार स्वदेशी प्रतिबंधक लस

भारतीय महिलांसाठी आनंदाची बातमी! गर्भाशय मुख कॅन्सरवर लवकरच येणार स्वदेशी प्रतिबंधक लस

Highlightsभारतात ही लस निर्माण झाली तर या लसीची किंमत खूप कमी असेल त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकालाही ही लस घेणे शक्य होईल.कमी वयात लग्न होणे, एकामागे एक मूल होणे, एकाहून अधिक जणांशी शारीरिक संबंध या कारणांमुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

कॅन्सर हा आजार जगभरात वेगाने पसरत असताना भारतातही त्याचे प्रमाण वाढत आहे. महिलांमध्ये गर्भाशयमुखाचा कॅन्सर ही गेल्या काही वर्षातील भारतातील वाढती समस्या आहे. भारतात दरवर्षी १ लाख २३ हजार महिलांना हा कर्करोग झाल्याचे निदान होते तर ६७ हजार महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो. हा आजार होऊच नये यासाठी विकसित करण्यात आलेली लस हा यावरील उत्तम असा प्रतिबंधात्मक उपाय आहे. मात्र ही लस भारतात परदेशातून येत असल्याने त्याची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे सर्व स्तरातील महिला ही लस घेऊ शकत नाहीत (India to launch first indigenous vaccine against cervical cancer Serum Institute from pune will launch soon). 

(Image : Google)
(Image : Google)

 

आनंदाची बाब ही की, पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटमध्ये या लसीचे संशोधन मागील काही काळापासून सुरू असून लवकरच ही लस भारतात उपलब्ध होणार आहे. गर्भाशय कर्करोगाच्या (Cervical Cancer Vaccine) रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' (qHPV) ही स्वदेशी लस विकसित केली जाणार असून सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी (DBT)या विभागामध्ये याविषयीच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्यामुळे या लसीची किंमत खूपच कमी होऊन ती जास्तीत जास्त महिलांना उपलब्ध होऊ शकेल. असे झाल्यास गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही साहजिकच आटोक्यात येईल. पुरुषांमध्येही ही लस फायदेशीर ठरणार असून तोंडांचे,घशाचे काही कॅन्सर, लैंगिक अवयव, गुदद्वार अशा काही कॅन्सरवर ही लस उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत या लसीचे १ कोटी डोस निर्माण होणार असल्याची माहिती सिरमकडून केंद्र सरकारला देण्यात आली. 

कॅन्सर रोखण्यासाठी लस कशी काम करते?

याबाबत आपल्या मनात शंका असू शकते. तर लैंगिक संबंध आल्यानंतर गर्भाशयाच्या मुखाला HPV नावाच्या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग बरीच वर्षे टिकून राहिला तर त्याचे कॅन्सरमध्ये रुपांतर होऊ शकते.त्यामुळे HPV vaccine म्हणजेच ही लस या संसर्गापासून स्त्रीचे रक्षण करते.साहजिकच कोणताही लैंगिक संबंध येण्याआधी ही लस दिल्यास ती सर्वात जास्त प्रभावी ठरते.त्यामुळे मुली वयात आल्यावर सोळा ते अठरा वर्षे वयाआधी ही लस देण्यात यावी. नंतरही लैंगिक संबंध यायच्या आधी देणे जास्त प्रभावी ठरते. पंधरा वर्षे वयाआधी ही लस दिल्यास दोन डोस द्यावे लागतात आणि त्यानंतर तीन डोस द्यावे लागतात. 

(Image : Google)
(Image : Google)

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी सांगतात...

भारतात महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोग होणाऱ्या महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. हा आजार होऊ नये म्हणून जर लस घ्यायची असेल तर त्याचे ३ डोस घ्यावे लागतात. या एका डोसची किंमत साधारणपणे ४ हजार रुपये असून ती ज्या सामाजिक स्तरात या लसीची आवश्यकता आहे त्यांना परवडू शकत नाही. भारतात ही लस निर्माण झाली तर या लसीची किंमत खूप कमी असेल त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकालाही ही लस घेणे शक्य होईल. कमी वयात लग्न होणे, एकामागे एक मूल होणे, एकाहून अधिक जणांशी शारीरिक संबंध या कारणांमुळे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे महिलांना या लसीचा खूपच फायदा होईल, मात्र जास्तीत जास्त महिलांपर्यंत याबाबत माहिती पोहोचणे गरजेचे आहे. 

Web Title: Good news for Indian women! Indigenous vaccine against cervical cancer coming soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.