Join us   

ग्रीन ज्यूस प्यायल्याने वजन कमी होते का? ग्रीन ज्यूस म्हणजे नक्की काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 5:44 PM

Green Juice Benefits + Why You Should Drink It Daily ग्रीन ज्यूसने करा दिवसाची सुरुवात, ब्लड शुगर राहेल कंट्रोलमध्ये - चरबीही घटेल..

वजन वाढणे ही सध्या सामान्य समस्या बनत चालली आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, कर्करोग, थायरॉईड आणि रक्तदाब यांसारख्या घातक आजारांचा धोका जास्त वाढतो. त्याचप्रमाणे मधुमेह हा देखील एक सायलेंट किलर आहे, जो हळूहळू शरीराला आतून पोकळ करतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी रक्तातील साखर आणि लठ्ठपणा या दोन्हींवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर वजन आणि ब्लड शुगर नियंत्रणात हवं असेल तर, आहाराकडे लक्ष द्यायला हवे, यासाठी आपण ग्रीन ज्यूसचा आपल्या डाएटमध्ये समावेश करू शकता(Green Juice Benefits + Why You Should Drink It Daily).

यासंदर्भात, फॅट टू स्लिमच्या संचालक आणि आहारतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा सांगतात, ''वजन कमी करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आपण ग्रीन ज्यूस पिऊ शकता. हिरव्या भाज्यांपासून तयार ग्रीन ज्यूस शरीराला हायड्रेट तर ठेवतेच यासह आरोग्याला देखील अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. उत्तम रिझल्टसाठी या ज्यूसचे सकाळी सेवन करावे.''

हेल्दी ग्रीन ज्यूस पिण्याचे फायदे

हिरव्या पालेभाज्यांपासून तयार ग्रीन ज्यूस अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध आहे. सकाळी हे ज्यूस प्यायल्याने पोट भरलेले राहते. यासह आजारांशी लढण्यासाठी ताकद देते. याशिवाय ग्रीन ज्यूसमध्ये एन्झाईम्सही भरपूर असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

नाश्त्याला अजिबात खाऊ नयेत ४ पदार्थ, वजन वाढेल आणि पोटही बिघडेल कायमचं

कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते

ग्रीन ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडेंट आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि गुड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.

ग्रीन ज्यूस करण्यासाठी लागणारं साहित्य

एक ग्रीन सफरचंद

पालकाची काही पानं

एक मुठभर चणे आणि गूळ सकाळी उठल्या उठल्या खा, 5 आजार राहतील लांब

ओव्याची पानं

आल्याचा तुकडा

या पद्धतीने तयार करा ग्रीन ज्यूस

सर्वप्रथम, हे सर्व साहित्य स्वच्छ धुवून, मिक्सरच्या भांड्यात घ्या. व याचा रस तयार करा. रस तयार झाल्यानंतर एका ग्लासमध्ये काढून घ्या. इच्छित असल्यास आपण त्यात लिंबाचा रस व पाणी मिक्स करू शकता. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य