निरोगी आरोग्यासाठी ग्रीन टी उपयुक्तच. ग्रीन टीत असलेल्या गुणधर्मांमुळे विविध आरोग्य समस्या बऱ्या होतात आणि त्यांचा धोकाही टळतो. ग्रीन टीमध्ये आरोग्यदायी ॲण्टिऑक्सिडण्टस असतात. यामुळे त्वचा निरोगी होते, ह्दयविकाराचा धोका कमी होतो. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहातं. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी , वाढलेलं वजन कमी करण्यासाठी ग्रीन टीचा उपयोग होतो. पण ग्रीन टी जर अति प्रमाणात प्याला तर मात्र आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात. वजन कमी होण्याच्या मोहाने जास्त ग्रीन टी प्याल्यास कर्करोगासारख्या आजारांचा धोकाही वाढतो. ग्रीन टी ही चैन नाही, ती केल्यास आरोग्यास न परवडणारी आहे. ग्रीन टी हा औषधासारखा प्रमाणात घेतला तर त्याचे फायदे होतात.
Image: Google
ग्रीन टी जास्त प्याल्यास..
1. ग्रीन टीमध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तो जास्त प्रमाणात प्याल्यास झोप उडण्याची समस्या निर्माण होते. निरोगी आरोग्यासाठी केवळ ग्रीन टी पिऊन चालत नाही तर शांत आणि पुरेशी झोपही आवश्यक असते. पण जास्त ग्रीन टी पिण्याचा परिणाम झोप उडण्यावर होतो. म्हणूनच तज्ज्ञ ग्रीन टी प्रमाणात पिण्याचा सल्ला देतात. कमीत कमी एक वेळा आणि जास्तीत जास्त दोन वेळाच ग्रीन टी पिणं आरोग्यदायी मानलं जातं. त्यापेक्षा जास्त ग्रीन टी प्याल्यास आरोग्यावर होणारे परिणाम चांगले नसून वाईटच होतात.
Image: Google
2. रक्तदाब वाढण्याची समस्या जास्त ग्रीन् टी पिल्याने निर्माण होण्याचा धोका असतो. ग्रीन टीमधील कॅफिन हे मज्जारज्जुंचं संरक्षण करण्याचं काम करतात. पण एक किंवा दोन कपापेक्षा जास्त ग्रीन टी प्याल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका निर्माण होतो.
Image: Google
3. ग्रीन टी जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील लोह कमी होतं. शरीराची अन्नपदार्थातील लोह शोषून घेण्याची क्षमता कमी होते. तसेच जास्त ग्रीन टी प्याल्याने भूक कमी लागते. शरीर अशक्त होवून आजारपणाला आमंत्रण मिळतं.
Image: Google
4. औषधी गुणांचा ग्रीन टी जर रिकाम्या पोटी प्याला तर ॲसिडिटीचा त्रास होतो. तज्ज्ञ ग्रीन टीचं सेवन काही खाल्ल्यानंतर करण्याचा सल्ला देतात तो यामुळेच. ग्रीन टीमधील कॅफिन घटक जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास जीव घाबरणं, चक्कर येणं, बध्दकोष्ठतेचा त्रास होवू शकतो. ग्रीन टीमध्ये गोडाचं प्रमाण जास्त असल्यास अति प्रमाणात ग्रीन टी प्याल्यास मधुमेह होण्याचा धोकाही निर्माण होतो.