Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सद्गुरू सांगतात, कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; मिळेल ताकद इतकी की..

सद्गुरू सांगतात, कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; मिळेल ताकद इतकी की..

Groundnuts - the yogic superfood - right way to eat peanuts and horse gram : कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खा, वजन कमी करण्यासाठी बेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2024 07:07 PM2024-06-16T19:07:20+5:302024-06-16T19:13:00+5:30

Groundnuts - the yogic superfood - right way to eat peanuts and horse gram : कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खा, वजन कमी करण्यासाठी बेस्ट

Groundnuts - the yogic superfood - right way to eat peanuts and horse gram | सद्गुरू सांगतात, कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; मिळेल ताकद इतकी की..

सद्गुरू सांगतात, कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; मिळेल ताकद इतकी की..

आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष देणं कठीण झालं आहे (Sadguru Jaggi Vasudev). अपुरी झोप, जीवनशैलीकडे लक्ष न देणे, शिवाय योग्य पदार्थांचा आहारात समावेश न करणे, यामुळे थकवा येतो (Food). जर आपल्याला थकवा येत असेल तर, आपण आपल्या आहारात प्रोटीनयुक्त कुळीथ डाळीचा समावेश करू शकता (SuperFood).

प्रोटीनमुळे शरीरात उर्जा निर्माण होते. शिवाय त्वचा, केस आणि इम्युनिटीची समस्या दूर होऊ शकते. पण कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे किती? कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे कधी आणि कशा पद्धतीने खावे? याची माहिती ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी दिली आहे(Groundnuts - the yogic superfood - right way to eat peanuts and horse gram).

कुळीथ डाळीचं सेवन कसं करावं?

कुळीथ डाळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. या डाळीला रात्रभर भिजत घालून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वेट लॉससाठीही मदत होते. त्यामुळे मोड आलेली कुळीथ खाणं फायदेशीर ठरू शकते.

तुम्ही चुकीच्या पद्धतीने तर कांदा खात नाही? पाहा कांदा कच्चा खावा की शिजलेला; कशाने फायदा होतो?

शरीरात तयार करते उष्णता

सद्गुरूंच्या मते, कुळीथाच्या डाळीमुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे मसल्स बिल्ड आणि वजन कमी करण्यास मदत होते. शरीरातील उष्णता संतुलित ठेवायची असेल तर, कुळीथाची डाळ खाल्ल्यानंतर मोड आलेली हिरवे मुग खाऊ शकता.

वेट लॉससाठी मदत

कुळिथाच्या डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यात आढळणारे घटक फॅट बर्नर म्हणून काम करतात. यासह कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.

जेवण बंद केले, कमी खाल्ले तरी वजन वाढते! वेट लॉससाठी खाणे गरजेचे कारण..

उकडलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे

उकडलेले शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात फॅटी ऍसिडस्, रेझवेराट्रोल आणि इतर फॅटी ऍसिडस् हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. आपण नाश्त्यामध्येही उकडलेले शेंगदाणे खाऊ शकता. 

Web Title: Groundnuts - the yogic superfood - right way to eat peanuts and horse gram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.