भारतातील अनेक राज्यांमध्ये गुढीपाडवा (Gudhi Padhava 2024) मोठ्या प्रमाणात साजर होत आहे. या दिवशी आवर्जून श्रीखंड पुरीचा बेत केला जातो. या शिवाय गुढी उभारल्यानंतर कडुलिंब आणि गूळ खाल्ले जाते (Neem Leaves). कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे (Jaggery). पण गुढीपाड्व्यानिमित्त कडुलिंब आणि गुळ का खावे? कडुलिंब आणि गुळ खाण्याचे महत्व काय? याचा विचार आपण कधी केला आहे का
कडुलिंब आणि गुळात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत (Health Benefits). जे आरोग्य आणि सौंदर्याला फायदेशीर ठरतात. पण कडुलिंब आणि गुळ खाण्याचे फायदे किती? याची माहिती न्यूट्रिशनिस्ट श्रेया गोयलने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत शेअर केली आहे(Gudhi Padhava Special : Neem Leaves and Jaggery : Weaving Health into Tradition).
थुलथुलीत मांड्या - हिप्सवरची चरबी वाढली? करा ४ गोष्टी- व्यायाम न करताही घटेल चरबी
न्यूट्रिशनिस्ट म्हणतात, 'कडुलिंबातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. तर गुळातील गुणधर्म आणि गोडवा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. या दोन्हीच्या मिश्रणाचा आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.'
कडुलिंब-गुळ खाण्याचे फायदे
रक्त शुद्ध करते
कडुलिंबाची पाने त्यांच्या डिटॉक्सिफिकेशन गुणधर्मांसाठी ओळखली जातात. तर गूळ रक्त शुद्ध करण्यास मदत करते. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्याने, रक्त शुद्ध होण्यास आणि शरीरातील डिटॉक्स पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.
रोगप्रतिकार शक्ती वाढते
कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात. शिवाय अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. तर गुळात लोह आणि इतर खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पचनक्रिया राहते उत्तम
कडुलिंबाच्या पानाने पचनक्रिया उत्तम होते. तसंच कडुलिंबाची पाने लिव्हरची कार्यप्रमाणाली सुधारण्यास मदत करते. यामुळे पचनक्रिया सुधारते. तर गुळामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत होते. कडुलिंब आणि गुळ एकत्र खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
तळल्यावर पुऱ्या तेलकट होतात? पीठ भिजवताना घाला १ पांढरा पदार्थ, पुऱ्या तेलकट होणारच नाहीत
त्वचा निरोगी राहते
कडुलिंबाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. जे त्वचेचे रक्षण करण्यास मदत करते. तर, गुळामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि उजळ दिसते.
रक्तातील साखर नियंत्रणात राहते
एनसीबीआयवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, कडूलिंब आयुर्वेदातील सर्वोत्तम औषधांपैकी एक मानले जाते. ज्यामध्ये अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म असतात. जे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासून रोखतात. ज्यामुळे जर आपल्याला मधुमेह असेल तर, कडुलिंब आणि गुळ खा.