दातांची योग्य काळजी घेतली नाही तर ते तुटायला, खराब व्हायला वेळ लागत नाही. हिरड्यांमधून रक्त येणे हे तुम्ही तुमच्या दातांची योग्य काळजी घेत नसल्याचे लक्षण आहे.(Gum Bleeding), हिरड्यांमधून (Teeth) रक्तस्राव होण्याची अनेक कारणे असू शकतात. अयोग्य ब्रशिंग, प्लाक जमा होणे, घाण काढण्यासाठी फ्लॉसिंग करणे, दातांना इजा होईल असे अन्न खाणे किंवा जीवनशैलीशी संबंधित समस्या या गोष्टी मुख्य कारण असू शकतात. (Gums swelling home remedies) अशा स्थितीत हिरड्यांमधून थोडेसे रक्तही आले तर ते बरं करण्यावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. (Try these effective home remedies to get rid of gum bleeding and swollen gums)
गरम पाण्यानं गुळण्या करा
कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास आराम मिळेल. हिरड्यांमधून होणारा रक्तस्राव थांबेल आणि सूज आल्याने होणारा त्रासही कमी होईल. दिवसातून 4-5 वेळा हे करा.
हळदीची पेस्ट
हळदीमध्ये असलेले गुणधर्म शरीराच्या इतर भागांप्रमाणेच हिरड्यांनाही लाभ देतात. हळदीची पेस्ट हिरड्यांवर चोळा आणि 10 मिनिटे ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. असे दिवसातून २-३ वेळा करा, हिरड्यांना आराम मिळेल.
ऑईल पुलिंग
ऑईल पुलिंग दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तोंडातील जंतू, प्लाक आणि पायरियाची समस्या दूर होते. तोंडाचे आरोग्यही त्यामुळे चांगले राहते.
मध
मधाने हिरड्यांना मसाज केल्याने रक्तस्त्राव आणि सूज येण्याची समस्या दूर होते. मधातील दाहक-विरोधी गुणधर्म एका हिरडीतून दुसऱ्या हिरड्यांना होणारा संसर्ग रोखतात.
त्रिफला
कोमट पाण्यात त्रिफळा मिसळून कुस्करल्याने हिरड्यांमधून रक्त येणे थांबते. हे हिरड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
चेहरा निस्तेज, थकल्यासारखा वाटतो? झोपण्याआधी एक काम करा; फक्त ३ मिनिटात चेहरा दिसेल टवटवीत, उजळ
नारळाचं तेल
हिरड्यांवर नारळाचे तेल चोळणे ही हिरड्यांना रक्तस्त्राव किंवा सूज येण्यासाठी देखील एक प्रभावी आहे. तुम्ही हे सकाळी आणि संध्याकाळी करू शकता.
पेरूची पानं
पेरूच्या पानांमध्ये शक्तिशाली अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. दातांच्या समस्येपासून आराम मिळवण्याचा हा एक स्वस्त आणि प्रभावी उपाय आहे. पेरूच्या पानांमुळे तुम्हाला सुजलेल्या हिरड्या, हिरड्यांमधून रक्त येणे, दात पिवळे पडणे आणि दुखणे यापासून आराम मिळतो. ते वापरण्यासाठी, फक्त काही पाने पाण्यात उकळा आणि ते स्वच्छ धुवा. याशिवाय पानांची पेस्ट बनवून हिरड्यांवर लावा.