आपल्या आरोग्याचा थेट संबंध आपल्या पचनाशी असतो. निरोगी राहण्यासाठी पचनक्रिया व्यवस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण जे काही खातो ते नीट पचते, त्यातून शरीराला पूर्ण ऊर्जा मिळते आणि सकाळी पोट व्यवस्थित साफ होते. पण पोटाचे विकार जर आपल्याला छळत असेल तर, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, पोटात गॅसेस यासह इतर समस्या निर्माण होतात. ज्यामुळे पचनसंस्था नीट काम करत नाही (Stomach Problems).
बऱ्याचदा खाल्लेलं अन्न नीट पचत नाही. जर आपण देखील पचनसंस्थेच्या निगडीत समस्येने त्रस्त असाल तर, आहारतज्ज्ञ राधिका गोयल यांनी सांगितल्यानुसार, जेवणाअगोदर मुठभर भाजलेले चणे आणि गुळ खा (Health Care). यामुळे पचनक्रियेत अडथळे येणार नाही, शिवाय खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल(Gur chana - The secret to healthy snacking and Stomach Problems).
सकाळी पोट साफ होण्यासाठी डिनरआधी भाजलेले चणे आणि गुळ खा
- दररोज रात्री जेवणापूर्वी १ चमचा गूळ आणि भाजलेले चणे खावे.
- गुळामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते.
- शिवाय भाजलेल्या चण्यामध्ये व्हिटॅमिन बी, लोह, मॅग्नेशियम यासह उतर खनिजे आढळतात. जे निरोगी पचनास चालना देते आणि आतड्याची हालचाल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
रात्री 'या ' वेळी जेवण केले तर वजन घटणारच, वजन कमी करायचे तर पाहा जेवायची वेळ
- गुळ आणि चणे खाल्ल्याने मेटाबॉलिज्म सुधारते आणि पचनक्रिया चांगली राहते.
- उलट-सुलट पदार्थ खाण्याऐवजी या दोन गोष्टी खाल्ल्यास भूक नियंत्रणात राहील. शिवाय शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतील. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल.
- गुळ आणि चण्यामध्ये लोह असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करतात.
लग्नाची तारीख ठरली? फिटनेससाठी खाणं टाळता? ६ जबरदस्त टिप्स-लग्नात दिसाल फिट-सुडौल
- चण्यांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स असतात.य तसचं फॉस्फरस, आयर्न आणि प्रोटीन देखील असते. म्हणजेच चण्याचे नियमित सेवन केल्याने शरीराच्या अनेक समस्या दुर होतात.