आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक काहीही अन्हेल्दी पदार्थ खातात आणि अन्न हे फक्त पोट भरण्याचं साधन नाहीये हे विसरून जातात. जेवण हे शारीरिक नाही तर मानसिक संतुलनाचा आधारही आहे. आयुर्वेद आणि अधुनिक पोषण विज्ञान दोन्ही हेल्दी डाएटवर महत्व देतात. (Which Is Best Cooking Oil) बरेच लोक बटाटा, टोमॅटो, वांगी यांसारख्या कमी पोषणयुक्त पदार्थांचे सेवन करतात. या जेवणात स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते आणि प्रोटीन्स कमी असतात. (Guru Shri Shri Ravi Shankar Told What Is The Best Oil For Cooking What Foods To Eat To Stay Healthy)
गुरूदेव श्री श्री रविशंकर यांनी या सांगितले की या पद्धतीने स्वंयपाक केल्यास आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. त्यानंतर अनेक सप्लिमेंट्सचा आधार घ्यावा लागतो. सप्लिमेंट्स घेणं अनेकदा योग्य वाटतं पण नियमित याचे सेवन योग्य ठरत नाही.
पोट सुटलं, मांड्या थुलथुलीत दिसतात? वापरा 5:2 चा वेट लॉस फॉर्म्यूला, वाढलेलं वजन चटकन उतरेल
स्वंयपाक करण्यासाठी मोहोरीचं तेल उत्तम
स्वंयपाक करण्यासारख्या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजकाल अनेकांना कोलेस्टेरॉलसारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी मोहोरीच्या तेलात स्वंयपाक करायला हवा. डाळ, भाजी शिजवताना त्यात कढीपत्त्याचा वापर करा.
आहारात तुपाचा समावेश करा
रोज तुपाचे सेवन करा कारण यामुळे जेवण अधिक सात्विक बनते. जेवणात फळं, हिरव्या पालेभाज्या मिलेट्स यांसारख्या प्राकृतिक आणि पौष्टीक पदार्थांचा समावेश करा जेवणाच्या ताटात सॅलेड, धणे, पुदिना किंवा नारळाच्या चटणीचा समावेश असावा.
पोटाची सुटलंय- दंड जाडजूड झाले? रामदेव बाबा सांगतात १ खास उपाय, झरझर घटेल चरबी
पालक-दुधी या पदार्थांचा आहारात समावेश करा
आठवड्यातून एकदा पालक, दूधी भोपळा, मोरींगा यांसारख्या पोष्टीक भाज्यांचे सेवन करा. जेवणाची गुणवत्ता तुम्ही कसे बनवता यावर अवलंबून असते. गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्ही जेवण शिजवताना पारंपारीक शैलींचा समावेश करायला हवा.
जे जेवण पित्त प्रकृतीसाठी उत्तम ठरते, गरजेचे नाही की ते जेवण कफ प्रकृती असलेल्या व्यक्तीसाठीही गुणकारी ठरेल. प्रत्येक व्यक्तीनं आपल्या प्रकृतीनुसार जेवण करायला हवं. यासाठी वेळोवेळी नाडी वैद्यांकडून आपली प्रकृती आणि समस्या याबाबत माहिती घेत राहायला हवी जेणेकरून शरीरात वात, पित्त, कफ संबंधित असंतुलनाचा त्रास उद्भवत नाही