Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उभं राहून पाणी पिण्याची सवय खरंच घातक आहे का? त्यामुळे कोणते आजार होतात?

उभं राहून पाणी पिण्याची सवय खरंच घातक आहे का? त्यामुळे कोणते आजार होतात?

कामाच्या गडबडीत सगळे एवढे अडकलेले असतात की, दोन क्षण थांबून फुरसतीने पाणी प्यायलाही अनेकांना वेळ नसतो. पण अशी सवय असेल तर लगेच सोडा. कारण ......

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 05:43 PM2021-08-02T17:43:41+5:302021-08-02T17:45:37+5:30

कामाच्या गडबडीत सगळे एवढे अडकलेले असतात की, दोन क्षण थांबून फुरसतीने पाणी प्यायलाही अनेकांना वेळ नसतो. पण अशी सवय असेल तर लगेच सोडा. कारण ......

Is the habit of standing up and drinking water really dangerous? So what are the diseases? | उभं राहून पाणी पिण्याची सवय खरंच घातक आहे का? त्यामुळे कोणते आजार होतात?

उभं राहून पाणी पिण्याची सवय खरंच घातक आहे का? त्यामुळे कोणते आजार होतात?

Highlightsउभे राहून पाणी प्यायल्यास एकाचवेळी शरीरातील अनेक स्नायूंवर ताण येतो.

बहुतांश लोकांची एकच सवय. घर असो की ऑफिस, पाण्याची बॉटल किंवा पाण्याचा पेला घ्यायचा आणि उभ्या उभ्याच तोंडाला लावायचा. दिवसातून जर आपण १० वेळेस पाणी पित असून तर त्यापैकी ७ वेळेस तर आपण उभ्या उभ्याच पाणी पितो. गॅसच्या ओट्याजवळ उभे राहून कुठले तरी काम करत पाणी पिणे, ही सवय तर अनेक जणींना असते. पण ही सवय आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे. घरातली ज्येष्ठ मंडळी आपल्याला बऱ्याचदा या सवयीबाबत टोकत असतात. पण तरीही आपण करायचे तेच करतो आणि उभ्या उभ्याच पाणी पितो. 

 

उभ्याने पाणी पिण्याची सवय असल्यास होऊ शकतात हे आजार...
१. उभे राहून पाणी प्यायल्याने वात प्रकृती वाढते आणि अकाली गुडघे दुखण्यास सुरूवात होते. 
२. उभ्या उभ्या पाणी प्यायल्यास सांध्यांमधील द्रवपदार्थांचे संतुलन बिघडते आणि संधीवाताचा त्रास सुरू होऊ शकतो.


३. उभ्याने पाणी प्यायल्यास अन्ननलिकेच्या स्थायूंवर दाब येतो. यामुळे व्यवस्थित अन्नपचन होण्यास त्रास होतो आणि पचनासंबंधी अनेक त्रास उद्भवू शकतात. ज्यांना कायमच पचनाचा त्रास असतो, त्यांनी बसून पाणी पिण्याचा प्रयोग करून पहावा. काही दिवसांतच आराम वाटू लागेल.
४. बसून पाणी पिले तर स्नायू आणि मज्जासंस्थेवर ताण येत नाही.
५. उभे राहून पाणी प्यायल्यास किडनी आणि मूत्राशयातील घाण तशीच राहते. त्यामुळे मूत्रमार्ग किंवा किडनीत संसर्ग होऊ शकतो. 


६. उभ्याने पाणी प्यायल्यास ते शरीरातील इतर द्रव्यांबरोबर चांगल्या पद्धतीने मिसळत नाही. त्यामुळे शरीरातील ॲसिडीक पदार्थांचा समतोल राखला जात नाही. त्यामुळे पचनाचे अनेक आजार उद्भवतात. छातीत कायम जळजळ झाल्यासारखे होते, काही जणांना जळकी लागल्याचा त्रास होतो.
७. उभे राहून पाणी प्यायल्यास एकाचवेळी शरीरातील अनेक स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे पाणी पिताना नेहमी आरामदायक स्थितीत बसावे, असे आयुर्वेदातही सांगितले आहे. बसून पाणी प्यायले तर ते खऱ्या अर्थाने अन्नपचनासाठी आणि इतर शारीरिक क्रियांसाठी निश्चितच मदत करते. 

 

Web Title: Is the habit of standing up and drinking water really dangerous? So what are the diseases?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.