जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सर्वत्र फादर्स डे साजरा करण्यात येतो. या दिवशी मुलं आपल्या वडिलांसाठी खास सरप्राईज अरेंज करतात. व त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. वडील आपल्या घरातील मजबूत आधारस्तंभ आहे. ज्याच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाचा डोलारा उभा राहतो. वडील प्रेम - माया जरी दाखवत नसले तरी, त्यांना आपल्या कुटुंबाची नेहमी काळजी असते.
वयानुसार अनेक आजार शरीरात उद्भवतात. वडील आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाही, ज्यामुळे नकळत शरीरात गंभीर आजार निर्माण होतात. रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह, प्रोस्टेट समस्या, कोलेस्टेरॉल यांसारख्या गंभीर समस्या वयानुसार वाढत जातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी(Happy Father's Day 2023: Healthy habits all dads should adopt to live long).
पुण्यातील मणिपाल हॉस्पिटलचे, सल्लागार - इंटर्नल मेडिसिन डॉ. प्रसाद बिवरे सांगतात, ''काही अत्यावश्यक सवयी आहेत, ज्या सर्व वडिलांनी त्यांच्या दैनंदिन दिनक्रमात समाविष्ट करायला हवेत. ज्यामुळे त्यांना निरोगी जीवन जगण्यास मदत होईल.''
दररोज व्यायाम करा
निरोगी आयुष्य जगण्यासाठी दररोज व्यायाम करायला हवा. जॉगिंग, सायकलिंग, पोहणे किंवा एखादा खेळ खेळणे असो, दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करायला हवा. व्यायामामुळे हृदय मजबूत होते, शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते, स्नायू आणि हाडे मजबूत होतात व अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते.
वजन कमी करताना अजिबात खाऊ नयेत ५ प्रकारची फळं, उलट परिणाम - वजन वाढते झपाट्याने
या गोष्टींचा आहारात समावेश करा
उत्तम आरोग्य राखण्यासाठी संतुलित आणि पौष्टिक आहाराचे सेवन करणे गरजेचं आहे. पुरुषांनी त्यांच्या आहारात फळे, भाज्या, प्रथिने व निरोगी फॅट्स यांचा समावेश करायला हवा. प्रोसेस्ड फूड, जास्त साखर असलेले स्नॅक्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स टाळणे महत्वाचे आहे. यामुळे वजन नियंत्रित राहू शकते. यासह जुनाट आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो.
स्ट्रेस कमी करा
वडील आपल्या घराचा मजबूत आधारस्तंभ आहे. मात्र, कुटुंबाला आधार देताना त्यांना अनेक स्ट्रेसचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देऊन, तणावावर नियंत्रण ठेवायला हवे. मेडीटेशन, व्यायाम, योगा करून त्यांनी आपली मानसिक स्थिती नियंत्रणात ठेवायला हवी. यासह त्यांच्यासोबत वेळ घालवा. ज्यामुळे त्यांचा काहीसा स्ट्रेस कमी होईल.
पाणी पिऊनही सतत तहान लागते, घशाला कोरड पडते? ५ कारणं, वेळीच ओळखा त्रासदायक आजाराची लक्षणं..
नियमित आरोग्य तपासणी करा
वडिलांना नियमित रेगुलर चेक - अपसाठी न्या. कोलेस्टेरॉलची पातळी, रक्तदाब आणि इतर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. यामुळे मोठ्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. प्रोस्टेट आणि कोलोनोस्कोपी यांसारख्या चाचण्या वयानुसार तपासल्या पाहिजेत. या चाचण्या कोणताही रोग ओळखण्यात मदत करू शकतात.
पुरेशी विश्रांती आणि चांगली झोप घ्या
पुरेशी विश्रांती आणि चांगली झोप आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बर्याच पुरुषांना व्यस्त दिनचर्येमुळे पुरेशी झोप मिळत नाही. पुरेशी झोप मिळाल्यानंतर मानसिक यासह शारीरिक हालचाली करायला उर्जा मिळते. उत्तम आरोग्यासाठी शरीराला निदान ७ ते ९ तासांची झोप आवश्यक आहे. झोपण्याअगोदार निदान अर्धा तास तरी स्क्रीन पाहू नका. डोळ्यांना विश्रांती द्या.