Join us   

आंतरराष्ट्रीय नो-डाएट डे : आज एक दिवस डाएटला सुटी, डाएट विसरा - करा स्वतःवर प्रेम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2024 10:00 AM

Happy International No Diet Day! : जगभरात ६ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय नो-डाएट डे' साजरा केला जातो..कारण..

आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती, स्वतःच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देत असतो (International No Diet Day). काही जण वजन कमी करण्यासाठी तर, काही जण वजन वाढवण्यासाठी डाएट करताना दिसत आहेत (Health Tips). आठवडाभर डाएट करणारा प्रत्येक जण एका चीट डेची आतुरतेने वाट पाहत असतो, आणि हाच चीट डे आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत असतो.

दरवर्षी ६ मे रोजी आंतरराष्ट्रीय नो डाएट दिवस साजरा करण्यात येतो. नो डाएट डे निमित्त, लोक नियम मोडतात आणि त्यांच्या आवडीचे काहीही खातात. एक प्रकारे पाहिल्यास, नो डाएट डे हा स्वतःवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज जगभरात हा दिवस साजरा करण्यात येत आहे. पण हा दिवस साजरा करण्यामागचं उद्देश काय? पाहूयात(Happy International No Diet Day!).

'आंतरराष्ट्रीय नो-डाएट डे'ची यंदाची थीम

दरवर्षी 'आंतरराष्ट्रीय नो-डाएट डे' ६ मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे, स्वतःवर प्रेम करणे. प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करण्याआधी एक थीम आयोजली जाते. या वर्षीची थीम, 'स्वतःला स्वीकारा, डाएट कल्चरला नकार द्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा.' अशी आहे.

आंतरराष्ट्रीय नो-डाएट डे हा दिवस का साजरा केला जातो?

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. लठ्ठपणा हे अनेक आजारांचे मूळ मानले जाते. अशा स्थितीत वजन वाढी बरोबर, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कोलेस्टेरॉल वाढणे, सांधेदुखी इत्यादी आजारांना आपले शरीर आमंत्रण देते. अशावेळी तज्ज्ञ अतिशय शिस्तबद्ध आहार घेण्याचा सल्ला देतात, जेणेकरून अशा समस्या आणि लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येईल.

दात स्वच्छ घासले तरी पिवळेच दिसतात? चमचाभर हळदीत मिसळून लावा '१' खास तेल, दात चमकतील

लोक अनेकदा आहाराच्या नियमांशी इतके जोडले जातात की, ते जीवनातून आनंद घ्यायला विसरतात. त्यामुळे इंटरनॅशनल नो डाएट डे साजरे करून, त्यांना एक दिवस खाण्यापिण्याचे सर्व नियम मोडून, मनसोक्त खाण्याचे स्वातंत्र्य दिले जाते.

आंतरराष्ट्रीय नो डाएट डेचा इतिहास

आंतरराष्ट्रीय नो डाएट डे हा पहिल्यांदा १९९२ रोजी साजरा करण्यात आला होता. ब्रिटीश महिला मेरी इव्हान्स यांनी या दिवसाची सुरुवात केली होती. लोकांना त्यांच्या शरीराच्या आकाराची लाज वाटू नये, आणि ते जसे दिसतात तसे त्यांनी स्वीकारायला हवे. हा मेरीचा मुख्य उद्देश होता. तसेच डाएटिंगमुळे होणारे नुकसान समजून घेणे, याची देखील त्यांनी जागरूकता पसरवली.

कुंडीतल्या कडीपत्त्याची वाढ खुंटली? मातीत मिसळा तांदुळाचे खत - हिरव्यागार पानांनी बहरेल रोप

मेरी इव्हान्स स्वतः एनोरेक्सियासारख्या आजाराने ग्रस्त होत्या. एनोरेक्सिया हा खाण्याच्या विकाराचा एक प्रकार आहे. याला एनोरेक्सिया नर्वोसा असेही म्हणतात. या आजारात शरीराचे वजन वाढण्याचा धोका असतो. एनोरेक्सियाने ग्रस्त लोक, त्यांचे वजन आणि शरीराच्या आकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.

अशावेळी मेरी इव्हान्सने डायट ब्रेकर नावाची संस्था सुरू केली आणि तिच्या संस्थेमार्फत पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय नो डाएट डे आयोजित केलं. तिला लोकांना हे समजवायचे होते की तुम्ही स्वतःला जसे दिसते तसे स्वीकारले पाहिजे. तुमच्या शरीराच्या आकारामुळे स्वतःला लाज वाटू देऊ नका. आयुष्य पूर्ण आनंदात जगा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स