Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डास चावू नयेत म्हणून माॅस्किटो रिपेलंट क्रीम चोपडता? त्वचेवर होतात दुष्परिणाम

डास चावू नयेत म्हणून माॅस्किटो रिपेलंट क्रीम चोपडता? त्वचेवर होतात दुष्परिणाम

डास चावून आजारांचा होणारा संसर्ग टाळण्यासाठी अंगाला माॅस्किटो रिपेलंण्ट (mosquito repellent) लावणं सोयिस्कर पर्याय वाटत असला तरी त्वचेसाठी (mosquito repellent effects on skin) मात्र हानीकारक आहे. हे दुष्परिणाम टाळायचे असतील तर नैसर्गिक उपाय (natural remedy to avoid mosquito repellent side effects) सहज करता येतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 05:33 PM2022-08-18T17:33:48+5:302022-08-18T17:44:55+5:30

डास चावून आजारांचा होणारा संसर्ग टाळण्यासाठी अंगाला माॅस्किटो रिपेलंण्ट (mosquito repellent) लावणं सोयिस्कर पर्याय वाटत असला तरी त्वचेसाठी (mosquito repellent effects on skin) मात्र हानीकारक आहे. हे दुष्परिणाम टाळायचे असतील तर नैसर्गिक उपाय (natural remedy to avoid mosquito repellent side effects) सहज करता येतात.

Harmful side effects of applying mosquito repellent on skin.. | डास चावू नयेत म्हणून माॅस्किटो रिपेलंट क्रीम चोपडता? त्वचेवर होतात दुष्परिणाम

डास चावू नयेत म्हणून माॅस्किटो रिपेलंट क्रीम चोपडता? त्वचेवर होतात दुष्परिणाम

Highlightsमाॅस्किटो रिपेलंण्टमध्ये अनेक प्रकारच्या रासायनिक घटकांचा वापर केलेला असतो. हे घटक त्वचेस हानिकारक मानले जातात.लेमनग्रास/ कडुलिंब/ नीलगिरी या तेलांचा वापर करुन घरच्याघरी त्वचेस सुरक्षित माॅस्किटो रिपेलंण्ट तयार करता येतात. 

ऋतू कोणताही असो डास आपल्याभोवती भुणभूणतातच. डास चावल्याने होणारे संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी डास पळवण्याचे विविध उपाय केले जातात. दिवसभर गुड नाईट वापरणं किंवा डास पळवणाऱ्या काॅइल जाळणं हे उपाय करुनही डास चावतच राहिले तर डास जवळ येवू नये, चावू नये म्हणून अंगाला माॅस्किटो रिपेलंण्ट (mosquito repellent) लावले जातात. डास चावण्याचा आणि आजारांचा संसर्ग टाळण्याचा प्रभावी उपाय म्हणून लहान मुलांपासून वृध्द माणसांपर्यंत बहुतांश लोकं डास दूर पळवणारे क्रीम अंगाला चोपडूनच घरात किंवा घराबाहेर वावरतात. या क्रिम्समुळे डासांचा त्रास टळतो हे खरं असलं तरी त्याचे त्वचेवरही (side effects of  applying mosquito repellent on skin ) दुष्परिणाम होतात याबद्दल मात्र बहुतांशजण अनभिज्ञ असतात.  माॅस्किटो रिपेलंण्टमध्ये अनेक प्रकारच्या रासायनिक घटकांचा वापर केलेला असतो. हे घटक त्वचेस हानिकारक मानले जातात. या घटकांमुळेच माॅस्किटो रिपेलंण्टचे त्वचेवर दुष्परिणाम होतात. 

Image: Google

माॅस्किटो रिपेलंण्टचे दुष्परिणाम

1. माॅस्किटो रिपेलंण्टमुळे डास दूर पळवणे साध्य होत असले तरी हे क्रीम सर्वांच्याच त्वचेला चालतं असं नाही. ज्यांची त्वचा संवेदनशील असते त्यांना माॅस्किटो रिपेलण्ट लावल्यानं त्वचेला आग होणं, ॲलर्जी होणं, खाज येणं, ला पुरळ उठणं असे त्रास होतात. पण या त्रासांकडे सामान्यत: दुर्लक्ष केलं जातं. पण असं दुर्लक्ष त्वचेचं नुकसान होण्यास कारणीभूत ठरतं. 

2. शरीराच्या उघड्या भागावर कुठेही डास चावतात. त्यामुळे केवळ हाताला, मानेलाच नाही तर चेहेऱ्यालाही माॅस्किटो रिपेलंण्ट लावले जातात. पण चेहेऱ्याला माॅस्किटो रिपेलंण्ट लावताना काळजी घेतली नाही किंवा ते लावताना डोळ्यांच्या जवळ लावलं गेलं तर डोळ्यांना जळजळतं, डोळ्यांखालची नाजूक त्वचेची आग होते. ओठांना माॅस्किटो रिपेलंण्टचा संपर्क झाल्यास ओठ बधिर होणं, ओठांची आग होणं असे त्रास होतात. 

Image: Google

करा नैसर्गिक उपाय!

माॅस्किटो रिपेलंण्टचे त्वचेवर होणारे दुष्परिणाम टाळायचे असतील तर डास पळवण्यासाठी माॅस्किटो रिपेलंण्ट लावण्याचा उपाय टाळायला हवा. डास चावू नये म्हणून त्वचेला, डोळ्यांन सुरक्षित असणारे नैसर्गिक उपाय करता येतात. 
1. सिट्रोनेला इसेन्शियल ऑइल हे खोबऱ्याच्या किंवा ऑलिव्ह तेलात एकत्र करुन हे मिश्रण दर दोन तासांनी अंगाला लावल्यास डास चावत नाही. 

2. लेमनग्रास, कडुलिंब किंवा नीलगिरीचं तेल खोबऱ्याच्या किंवा ऑलिव्ह तेलात घालून हे मिश्रण त्वचेवर लावल्यास डास चावत नाही आणि त्वचाही सुरक्षित राहाते.


 

Web Title: Harmful side effects of applying mosquito repellent on skin..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.