Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वारंवार पाय हलवण्याची सवय आहे? ही सवय गंभीर आजाराची लक्षणे तर नाहीत ना?

वारंवार पाय हलवण्याची सवय आहे? ही सवय गंभीर आजाराची लक्षणे तर नाहीत ना?

Restless legs syndrome पाय हलवण्याच्या सवयकडे दुर्लक्ष करणे ठरू शकेल घातक, आजच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 05:33 PM2022-12-28T17:33:51+5:302022-12-28T19:11:38+5:30

Restless legs syndrome पाय हलवण्याच्या सवयकडे दुर्लक्ष करणे ठरू शकेल घातक, आजच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक

Have a habit of moving your feet frequently? Is this not a habit but a symptom of a serious illness? | वारंवार पाय हलवण्याची सवय आहे? ही सवय गंभीर आजाराची लक्षणे तर नाहीत ना?

वारंवार पाय हलवण्याची सवय आहे? ही सवय गंभीर आजाराची लक्षणे तर नाहीत ना?

बसल्या बसल्या आपण अनेक वेळा व्यक्तींना पाय हलवताना पहिलंच असेल. असे लोक घरी किंवा ऑफिसमध्ये देखील काम करत असताना पाय हलवतात. काही लोकांना ही समस्या रात्री देखील उद्भवते. रात्री झोपताना देखील काहींचे पाय थरथरू लागतात. मात्र, ही समस्या जर कोणाला असेल तर त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. ही गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात. 

एंग्जायटी डिसऑर्डर

काही लोक एंग्जायटी डिसऑर्डरने त्रस्त असतात. जेव्हा एखादा व्यक्ती एका गोष्टीबद्दल वारंवार विचार करत असेल, किंवा त्याला कोणत्यातरी गोष्टीची चिंता सतावत असेल, तर त्यांचे पाय थरथरू लागतात. अशा लोकांनी ताबडतोब डॉक्टरांशी बोलून वेळीच उपचार घ्यावेत.

रेस्टलेस लेग्स सिंड्रोम

रेस्टलेस लेग्स सिंड्रोम ही समस्या तेव्हा उद्भवते, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पायांचे स्नायू नियंत्रणा बाहेर जातात. तेव्हा त्यांचे पाय स्वतःच कार्य करतात. दरम्यान, कधी कधी पायांवर अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे वारंवार पाय थरथरू लागतात.

डायबिटीक न्यूरोपॅथी

डायबिटीक न्यूरोपॅथी असलेले लोक नेहमी पाय हलवताना दिसतात. जेव्हा शरीरात मधुमेह नियंत्रणात राहत नाही तेव्हा साखरेचं प्रमाण वाढते. त्यामुळे पायांच्या नसा काम करण्याचं बंद करतात. त्या अस्वस्थतेमुळे पाय वारंवार हलतात. अशा स्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

हृदयविकाराचा धोका वाढतो

तज्ज्ञांच्या मते, पाय थरथरल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. रेस्टलेस लेग्ज सिंड्रोमने ग्रस्त असलेला व्यक्ती झोपण्यापूर्वी 200 ते 300 वेळा पाय हलवतो. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही वाढतात. पुढे हा गंभीर आजार हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजाराचे रूप घेते.

महिलांमध्ये आढळते आयरनची कमतरता

रेस्टलेस लेग्स सिंड्रोममुळे, बहुतेक लोकं झोपेत असतानाही पाय हलवतात. शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे असे घडते. महिलेला जर पाय हलवायची सवयी असेल, तर त्यांच्यामध्ये आयरनची कमतरता असू शकते. इतर जीवनसत्त्व आणि आयरनच्या कमतरतेमुळे असे घडते.

Web Title: Have a habit of moving your feet frequently? Is this not a habit but a symptom of a serious illness?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.