आपल्याकडे चहाचे चाहते काही कमी नाहीत. काही वेळा तर नुसतं चहा असं नाव जरी काढल तरी दिवसभरातील सगळा थकवा चुटकीसरशी दूर होतो. चहा हे एक पेय नसून ती एक संस्कृती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. देशभरात तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला चहा मिळू शकेल फक्त त्याचे स्वरूप वेगळे असेल. बदलत्या काळानुसार चहाचे स्वरूपदेखील बदलत आहे. चहाची चव ही त्याचे उत्पादन कुठल्या हवामानात, कुठल्या मातीत झाले आहे तसेच त्यावर कुठली प्रक्रिया केली आहे ह्यावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकारच्या चहाची खासियत आणि चव ही वेगळी असते. आजकाल आपण कुल्लड चहा, गुळाचा चहा, तंदुरी चहा, मसाला चहा असे चहाचे अनेक प्रकार बघतो. चहा पिण्यासोबतच तिचे शरीराला अनेक चांगले लाभ होतात. बडीशेप ही अन्नाचे पचन करण्यासाठी महत्वाची असते. याच बडीशेप पासून बनविलेली चहा तुमचे आरोग्य व स्किन यांच्यासाठी फायदेशीर आहे.(Benefits Of Fennel Tea).
बडीशेप चहा पिण्याचे काय फायदे आहेत ?
१. वजन कमी करते - जर तुमचे वजन कमी करायचे असल्यास रोजच्या डाएटमध्ये बडीशेप पासून बनविलेली चहा प्यायला विसरू नका. या चहामध्ये असणाऱ्या फायबरमुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील. या चहाचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरात फॅट्स जमा होणार नाहीत.
२. पचन व्यवस्था सुरळीत करते - मुळातच, अन्नाचे पचन व्हावे या हेतूने आपण जेवण झाल्यावर बडीशेप खातो. बडीशेपमध्ये असणाऱ्या काही महत्वाच्या घटकांमुळे आपल्याला अपचनाचा त्रास होत नाही. बडीशेपपासून तयार केलेला चहा प्यायल्याने तुमची पचन व्यवस्था सुरळीत चालू राहण्यास मदत होते.
३. डोळ्यांसाठी फायदेशीर - ही चहा प्यायल्याने फक्त तुमचे आरोग्य आणि स्कीनचं नाही तर डोळ्यांच्या आरोग्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरते. याच्या नियमित सेवनाने डोळ्यांची जळजळ व डोळ्यांनी धुरकट दिसण्याची समस्या लगेच दूर होते.
४. पिंपल्स कमी होतील - या चहामध्ये असणाऱ्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट या घटकांमुळे चेहेऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या दूर होईल. चेहेऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी या चहाचे सेवन करा.
५. रक्त शुद्ध करते - बडीशेपमध्ये असणारे फायबर आणि अन्य काही महत्वाचे घटक आपल्या शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी उपयुक्त असतात. यामुळे तुमचे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्त शुद्ध झाल्यामुळे तुम्ही विविध आजार होण्यापासून स्वतःचा बचाव करू शकता.
६. पाळीदरम्यान सेवन करा - जर तुम्ही अनियमित येणाऱ्या पाळीच्या त्रासाने त्रस्त असाल तर चहाचे सेवन जरूर करा. या चहामध्ये असणाऱ्या आयर्न, व्हिटॅमिन्स, पोटॅशियममुळे तुमची पाळी नियमित येण्यासाठी मदत होते. पाळीदरम्यान येणाऱ्या क्रॅम्सने वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी बडीशेपचा चहा नक्की प्या.
७. झोपेची समस्या - चांगली झोप येण्यासाठी शरीरातील मेलॅटोनीन नामक हार्मोन्सची पातळी योग्य प्रमाणात असण्याची गरज असते. या हार्मोनचे प्रमाण वाढविण्यासाठी हा चहा पिणे फायदेशीर ठरते. जर तुम्हाला झोपेसंबंधित काही समस्या असेल किंवा झोप कमी येत असेल तर या चहाचे सेवन करा.