कोलेस्टेरॉल हे दोन प्रकारचे असतात (Bad Cholesterol). त्यातील एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी घातक ठरते. बॅड कोलेस्टेरॉलला लिपोप्रोटीन असेही म्हणतात (Health Tips). रक्तातील एलडीएलची उच्च पातळी नसा ब्लॉक करू शकते, ज्यामुळे रक्ताभिसरणामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात (Curd). ज्यामुळे हृदय रोगाचा धोका देखील वाढतो. त्यामुळे रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आहाराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
योग्य खाण्याच्या सवयींच्या मदतीने आपण रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकता. आहारात दह्याचा समावेश केल्यानेही कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहू शकते. पण खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दह्यात एक गोष्ट मिसळून खा. यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होईल(Having a bowl of curd daily can lower bad cholesterol).
घरात दही - बेकिंग सोडा नाही? कपभर बेसनाचा करा स्पॉन्जी जाळीदार ढोकळा; १५ मिनिटात ढोकळा रेडी
दह्यात इसबगोल मिसळा
द हेल्थ साईट. कॉमच्या वेबसाईटनुसार, 'दह्यात थोडे इसबगोल मिसळून खाल्ल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते. इसबगोलमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जे शरीरातील विषारी पदार्थ कमी करण्यास प्रभावी ठरते. हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रक्त परिसंचरण सुधारू शकते . यासाठी दुपारच्या जेवणाच्या वेळी एक वाटी दह्यात साधारण अर्धा चमचा इसबगोल मिसळा. त्यात साखर न मिसळता सेवन करा. यामुळे खूप फायदा होईल.
दही आणि गुळ
बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी दह्यात गुळ मिसळून आपण खाऊ शकता. गुळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच, संपूर्ण हृदयाच्या आरोग्यासाठी ते सर्वोत्तम मानले जाते. याशिवाय शरीराला उबदार ठेवण्यासाठीही दही आणि गुळ प्रभावी ठरते.