Join us   

७ दिवस रोज खा फक्त ३ खजूर, तब्येतीच्या तक्रारी राहतील दूर, ताकद वाढवण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2022 4:45 PM

Having Dates Regularly is good for Health problems : कॅन्सरपासून-वंध्यत्वापर्यंतच्या समस्या दूर राहण्यास होईल मदत

ठळक मुद्दे पोटात चांगेल बॅक्टेरीया जास्त असतील तर विविध प्रकारच्या कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकतो. खजूर हे पुरुषांच्या प्रजननासाठी उपयुक्त असणारे एक महत्त्वाचे फळ आहे. 

खजुरातील पोषक घटकांमुळे खजुराला 'वडंर फूड' असं म्हटलं जातं. निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. खजूर खाल्ल्यानं शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. 100 ग्रॅम खजूर खाऊन 277 कॅलरीज मिळतात. खजुरात असलेल्या फ्लेवोनॉइडस या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे मधुमेह, अल्झायमर आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. खजुरात असलेल्या कॅरेटोनाॅइड या ॲण्टिऑक्सिडण्टसमुळे ह्दयाचे आणि डोळ्याचे आरोग्य चांगलं राहातं. खजुराचा फायदा मेंदूविकासासाठे होतो. इतकेच नाही तर बद्धकोष्ठतेसारख्या समस्येपासून दूर राहण्यासाठी खजूर उपयुक्त असतो (Having Dates Regularly is Good for Health Problems). 

(Image : Google)

खजुरातून शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम, काॅपर, मॅगनीज, लोह ही खनिजं आणि ब हे जीवनसत्व मिळतं. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी, लोह वाढण्यासाठी किंवा विविध खनिजे आणि व्हिटॅमिन्स मिळण्यासाठी खजूर फायदेशीर असतो. खजूरामध्ये सेलेनियमबरोबरच १५ खनिजे असतात. हे घटक कॅन्सरशी लढण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. याबरोबरच खजुरात २३ प्रकारचे अमिनो अॅसिड तसेच अनेक असंतृप्त फॅटी अॅसि़डस असतात. त्यामुळे हे सगळे फायदे हवे असतील तर दिवसभरात ३ खजूर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. याचे परिणाम दिसण्यासाठी किमान १ आठवडा सलग खजूरांचे सेवन करायला हवे. आहारतज्ज्ञही अनेकदा लहान मुलांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सगळ्याना आवर्जून खजूर खाण्याचा सल्ला देतात. खजूरामध्येही काळा खजूर, लाल खजूर, खूप कोरडा खजूर, चिकट खजूर असे बरे प्रकार पाहायला मिळतात. या खजुराचे लाडू, चटणी, बर्फी, मोदक, खीर असे बरेच पदार्थ आपण करु शकतो. आता आरोग्याच्या कोणत्या समस्यांसाठी नियमित खजूर खाणे फायदेशीर असते ते पाहूया. 

१. हृदयासाठी फायदेशीर 

खजूरामध्ये असणाऱे अँटीऑक्सिडंटस हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल नष्ट करण्यास मदत करतात. हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोक सारख्या जीवावर बेतणाऱ्या समस्यांपासून दूर राहण्यास याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे आहारात आवर्जून खजूराचा समावेश करायला हवा. 

२. हाडे मजबूत राहण्यास मदत 

खजुरातील मॅग्नेशियम, पोटॅशियम, सेलेनियम, कॉपर, मँगनिज हे हाडांसाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे रक्त घट्ट करण्यासाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

(Image : Google)

३. ताणतणाव दूर होण्यास मदत 

डोक्यातील ताण आणि सूज कमी करण्यासाठी खजूराचा चांगला उपयोग होतो. स्मरणशक्ती वाढवण्याबरोबरच मेंदूचे कार्य वेगवान करण्यासाठी, मेंदूशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी खजूर चांगला असतो. 

४. पोटाचा कॅन्सर होण्यापासून बचाव 

खजूरातील फायबर पोटातील चांगले बॅक्टेरीया वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. पोटात चांगेल बॅक्टेरीया जास्त असतील तर विविध प्रकारच्या कॅन्सरपासून आपला बचाव होऊ शकतो. 

५. मेल इनफर्टीलिटीवर उपयुक्त  

प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी खजूर फायदेशीर असतो. नियमित खजूर खाल्ल्याने स्पर्मची गुणवत्ता आणि संख्या वाढण्यास मदत होते. त्यामुळे खजूर हे पुरुषांच्या प्रजननासाठी उपयुक्त असणारे एक महत्त्वाचे फळ आहे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना