डोकेदुखी हा आजार सामान्य जरी असला तरी, डोकेदुखीचं कारण जाणून घेणं महत्वाचं आहे. डोकेदुखी अनेक कारणांमुळे उद्भवते. अनकेदा संपूर्ण किंवा माथ्याचा अर्धा भाग दुखतो. डोकेदुखीच्या अनेक कारणांपैकी गॅस हे देखील एक मुख्य कारण आहे. पोटात गॅस तयार झाल्यानंतर डोकेदुखीचा त्रास प्रचंड होतो. डिहायड्रेशन, भूक किंवा ताणतणावामुळे देखील डोकेदुखी होऊ शकते. काहीही खाल्ल्यानंतर पोटात गॅस तयार होणे किंवा पोट फुगणे याचा थेट संबंध अन्न नीट न पचण्याशी असतो. अपचनाचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. ज्यामुळे डोकेदुखी होते.
आयुर्वेदात, पचन सुधारण्यासाठी आणि गॅसमुळे होणारी डोकेदुखी दूर करण्याचे अनेक मार्ग आहेत. यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट आणि आयुर्वेदिक समुपदेशक चारुल वर्मा यांनी काही आयुर्वेदिक टिप्स शेअर केले आहेत. जे गॅसच्या संबंधित डोकेदुखीपासून सुटका करण्यात मदत करू शकतात(Headache due to gas? Try these 5 home remedies).
कोमट पाणी प्या
गॅसमुळे होणारी डोकेदुखी दूर करण्यासाठी कोमट पाणी प्या. कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली होते. दिवसभरात थोडे थोडे कोमट पाणी पीत राहा. विशेषतः, जेवल्यानंतर सुमारे २० मिनिटांनंतर कोमट पाणी प्या.
उन्हाळ्यात चुकुनही खाऊ नका हे ५ थंड पदार्थ, शरीराला थंडावा देण्याऐवजी वाढवतील उष्णता
मसाले
आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत, जे पचनासाठी उत्तम मानले जातात. स्वयंपाक करताना या मसाल्यांचा वापर केल्यास हळूहळू पचनक्रिया सुधारते, व पोटात गॅसही तयार होत नाही. आले, जिरे, लसूण, ओवा, हिंग आणि हळद पचनास मदत करतात.
कार्बोनेटेड पेय टाळा
बहुतांश लोकांना कार्बोनेटेड पेय प्यायला आवडते, परंतु, हे पेय पचनसंस्था कमकुवत करतात. ते पोटात अधिक वायू निर्माण करतात, ज्यामुळे गॅसची समस्या वाढते.
उन्हाळ्यात डोळे लालेलाल झाले, सतत चुरचुरतात, आग होते, पाण्याच्या धारा? ६ सोपे उपाय, डोळे सांभाळा..
दररोज व्यायाम करा
दैनंदिन जीवनात शारीरिक हालचालींच्या अभावामुळे पोटातील गॅसची समस्या वाढते. व्यामाला वेळ नसेल तर निदान रोज योगासना करा. योगासना केल्याने पोटातील गॅसची समस्या कमी होईल. व फ्रेश वाटेल.
नाभी अभ्यंग
गॅस नीट पास होत नसेल तर, नाभी अभ्यंग करा. यासाठी नाभीभोवती एरंडेल किंवा तिळाच्या तेलाने मसाज करा. घड्याळाच्या दिशेने निदान १० मिनिटे मसाज करा. यामुळे पचनसंस्थेतील रक्ताभिसरण सुधारेल.