Join us   

दिवसभर भरपूर एनर्जी आणि निवांत झोप हवी ? झोपताना करा पायाला मालिश, फायदा असा की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 6:56 PM

मन शांत होवून  गाढ झोप लागण्यासाठी, मनावरचा ताण कमी होवून दुसऱ्या दिवशी कामाला ऊर्जा मिळण्यासाठी  रोज रात्री फक्त 5 मिनिटं पायांना (coconut oil massage on feet) खोबऱ्याच्या तेलाची मालिश करावी. 

ठळक मुद्दे खोबऱ्याच्या तेलानं मालिश केल्यास तळपायांना होणारा जिवाणुंचा संसर्ग रोखला जातो. झोपेशी निगडित असलेल्या समस्या दूर करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलानं पायांना मालिश केल्यास फायदा होतो. 

केस आणि त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी खोबऱ्याचं तेल (coconut oil)  उपयुक्त असतं. पण रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटं पायांना खोबऱ्याचं तेल लावून मालिश (coconut oil massage on feet)  केल्यास आरोग्यास अनेक फायदे मिळतात. दुसऱ्या दिवशी सकाळी काम करण्यास ऊर्जा मिळते तर रात्री शांत झोप लागण्यासही मदत मिळते. खोबऱ्याच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे खोबऱ्याच्या तेलानं पायांना मालिश केल्यास आरोग्यास 8 फायदे (health benefits of coconut oil massage on feet)  मिळतात. 

Image: Google

1. खोबऱ्याच्या तेलात ई जीवनसत्व असतं. हे जीवनसत्व त्वचेचं नुकसान भरुन काढतं. पायांना नियमित खोबरेल तेलाची मालिश केल्यास त्वचा कोरडी पडत नाही. तळपायाला भेगा पडत नाही. तसेच पायाची नखं देखील चमकदार आणि मजबूत होतात. 

2. पायाचे स्नायू मजबूत आणि लवचिक होतात. खोबरेल तेलाची मालिश केल्यानं पायातील वेदना कमी होतात. 

3. खोबरेल तेलात ॲण्टि ऑक्सिड्ण्ट आणि जिवाणूविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळेच खोबऱ्याच्या तेलानं पायाची मालिश केल्यास तळपायांना जिवाणुंची संसर्ग होत नाही. 

Image: Google

4. जीवाणुविरोधी गुणधर्मामुळे पायांवर जिवाणुंची वाढ होत नाही. त्यामुळे पायांना घाणेरडा वास येत नाही. 

5. तासनतास एकाच जागी बसून काम केल्यानं शरीर आखडतं. शरीराला जडपणा येतो. पण रात्री झोपण्याआधी खोबरेल तेलाने मालिश केल्यास रक्त प्रवाह सुधारतो. मधुमेह असलेल्या रुग्णांनी  पायाला खोबरेल तेलानं मालिश केल्यास खूप फायदे मिळतात. 

6. दिवसभराच्या कामानं मनावर ताण येतो. मनात भीती निर्माण होते. खोबऱ्याच्या तेलानं रोज रात्री पायांना मालिश केल्यास मनावरचा ताण कमी होतो. अभ्यास सांगतो की केवळ 5 मिनिटं पायांना खोबऱ्याच्या तेलानं मालिश केल्यास मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

Image: Google

7. खोबऱ्याच्या तेलानं पायांना मालिश केल्यास थकवा दूर होतो. शरीराची ऊर्जा वाढते. नसा मोकळ्या होतात. त्याचा परिणाम म्हणजे दुसऱ्या दिवशी काम करण्यास उत्साह येतो, ऊर्जा मिळते तसेच काम करताना मनाची एकाग्रता वाढते. 

8. झोपेशी निगडित समस्या असल्यास रोज रात्री पायांना खोबऱ्याच्या तेलानं अवश्य मालिश करावी. खोबऱ्याच्य तेलाच्या मालिशनं पायांच्या  नसा मोकळ्या होतात त्यामुळे गाढ आणि शांत झोप लागण्यास मदत होते. रात्रीच्या वेळेस पायांना खोबऱ्याच्या तेलानं मालिश केल्यास तेल शोषून घेण्यास त्वचेला पुरेसा अवसर मिळतो आणि खोबऱ्याच्या तेलातील गुणधर्माचे आरोग्यास फायदे मिळतात. समजा रोज पायांना तेलाची मालिश करायला जमत नसल्यास आठवड्यातून तीन ते पाच वेळा मालिश केली तरी ते फायदेशीर ठरतं. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सत्वचेची काळजी