पदार्थ तयार झाल्यानंतर आपण शेवटी कोथिंबीर (Coriander) भुरभुरून डिश सर्व्ह करतो. कोथिंबीरमुळे पदार्थाला एक वेगळीच चव येते. पण आपल्याला कोथिंबीर खाण्याचे फायदे ठाऊक आहे का? कोथिंबीरमधील पौष्टीक घटकांमुळे शरीरातील गंभीर आजारांचा धोका कमी होतो (Health Benefits). जर आपल्याला पीएमएस, ॲसिडिटी, थायरॉईड, मायग्रेन, रात्रीचा घाम येणे आणि पित्ताशी संबंधित समस्या असेल तर, आपण आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी सांगितलेला एक सोपा आणि घरगुती उपाय करून पाहू शकता. कोथिंबीरीचं पाणी करून प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतील. पण मग कोथिंबीरीचं पाणी करायचं कसं? यामुळे आरोग्याला कोणते आणि किती फायदे मिळतात? पाहूयात(Health Benefits of Coriander leaves Water).
हिरव्या कोथिंबीरीचे पाणी पिण्याचे फायदे
दृष्टी तीक्ष्ण करते
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते
खराब कोलेस्ट्रॉल कमी करते
ICMR सांगते उन्हाळ्यात उसाचा रस पिणे टाळा; येऊ शकतो हृदयविकाराचा झटका- मधुमेह आणि..
हाडे मजबूत करते
पचनसंस्था सुधारते
त्वचा निरोगी ठेवते
हृदय निरोगी ठेवते
उष्माघातापासून संरक्षण करते
कोथिंबीरीचे आरोग्यदायी फायदे
कोथिंबीरमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. कोथिंबीर हे एक व्हिटॅमिन ए आणि सी चा उत्तम स्रोत आहे. याशिवाय फायबर, लोह, मँगनीज, कॅल्शियम, व्हिटॅमिन के, फॉस्फरस इत्यादी पोषक तत्त्वेही मुबलक प्रमाणात आढळतात. त्यात संतृप्त चरबीचे प्रमाण फारच कमी आहे आणि त्यात लिनोलिक ऍसिडचे प्रमाण चांगले आहे. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
राष्ट्रीय पोषण संस्थानुसार, कोथिंबीरमध्ये ३१ कॅलरीज, २ ग्रॅम कार्बोहायड्रेट, ४ ग्रॅम प्रथिने, ०.७ ग्रॅम फॅट, १४६ मिलीग्राम कॅल्शियम, ५.३ मिलीग्राम लोह, ४.७ ग्रॅम फायबर, २४ मिलीग्राम व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, यासह विविध घटक आढळतात.
कोथिंबीरीचे पाणी कसे तयार करायचे?
सर्वात आधी भांड्यात पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात मुठभर कोथिंबीर घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करा. कोमट झाल्यानंतर पाणी प्या.
किती पाणी प्यायल्यानं शरीरातलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं? तज्ज्ञ सांगतात; हृदय निरोगी ठेवायचं तर..
कोथिंबीरीचे पाणी कधी प्यावे?
आपण कोथिंबीरीचे पाणी कधीही पिऊ शकता. किंवा सकाळी उपाशी पोटी किंवा जेवणाच्या ४५ मिनिटे आधी किंवा नंतर पिऊ शकता.