कढीपत्त्याचा वापर आपण सहसा फोडणी किंवा त्याची चटणी तयार करण्यासाठी करतो. कढीपत्ता खाण्याचे अनेक फायदे आहेत. कढीपत्ता फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसून, आरोग्य, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. यात कॉपर, मिनरल्स, कॅल्शियम, फास्फोरस, फायबर, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि लोह यांसारखे गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराला कढीपत्त्यातून असंख्य फायदे मिळतात (Health Benefits). शिवाय रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पानं चघळून खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. शिवाय त्यातील एमिनो अॅसिड्समुळे केसांवर नवी चमक येते. शिवाय हेअर फॉलपासून सुटका होते.
यासंदर्भात, आयुर्वेदिकतज्ज्ञ आचार्य बालकृष्ण सांगतात, 'कढीपत्त्याचा वापर सहसा फोडणी देताना होतो. फोडणीमध्ये कढीपत्ता घालताच त्याची चव दुपट्टीने वाढते. यातील गुणधर्मामुळे ब्लड धुगर लेव्हल, बॅड कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. शिवाय पोटाचे विकार दूर करण्यासाठीही कढीपत्त्याचा वापर करण्यात येतो'(Health Benefits Of Curry Leaves: 5 Proven Benefits Of Eating Curry Leaves).
कढीपत्ता खाल्ल्याने आरोग्याला कोण-कोणते फायदे मिळतात?
मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर
डायबिटिजग्रस्त रुग्णांसाठी कढीपत्ता फायदेशीर ठरते. ज्यांच्या शरीरातील ब्लड शुगर लेव्हल जास्त आहे, त्यांनी कढीपत्त्याच्या पावडरचे सेवन करावे. यासाठी नियमित कढीपत्त्याची पावडर पदार्थात मिक्स करून खा. कढीपत्त्यातील हायपोग्लायसेमिक गुणधर्म साखरेची पातळी कमी करते. यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आणि इन्शुलीन योग्य प्रकारे तयार होते.
रोज फक्त १ चमचा ‘ही’ पावडर खा, आयुष्यात कधी केस गळण्याची समस्या छळणार नाही!
वजन कमी करण्यासाठी प्रभावी
कढीपत्ता खाऊन वजनावर नियंत्रण मिळवता येते. नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या माहितीनुसार, कढीपत्ता गायक्लोरोमेथेन, एथिल एसीटेट सारखे तत्व असतात. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यासह चयापचय क्रिया सुधारते. शिवाय बॉडी डिटॉक्स होते.
त्वचेसाठी फायदेशीर
कढीपत्त्याची पेस्ट स्किनवर लावल्यास त्वचेच्या अनेक समस्या सुटतात. चेहऱ्यावरील पिंपल्स, मुरुमांचे डाग यासह डेड स्किन निघून जाते.
पोटाचे विकार होतात दूर
जर आपल्याला ब्लोटिंग, गॅसेस, यासह पोटाचे इतर विकार छळत असतील तर, कढीपत्त्याचा काढा तयार करून प्या. यासाठी एका बाऊलमध्ये एक ग्लास पाणी घ्या. त्यात कढीपत्त्याची काही पानं घालून उकळवा. पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी कोमट करून प्या. यामुळे पोटाचे अनेक विकार दूर होतील.
केसांच्या वाढीसाठी करते मदत
हिवाळ्यात केस फार गळतात. यावर उपाय म्हणून आपण कढीपत्त्याचा वापर करून पाहू शकता. यात व्हिटामीन बी, व्हिटामीन सी, प्रोटीन आणि एंटीऑक्सिडेंट्स यांसारखी पोषक तत्व असतात. यामुळे केस वाढवण्यास मदत होते. आपण याचा वापर मेहेंदी, तेल किंवा त्याचाह मास्क तयार करून केसांना लावू शकता.