Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > १ ग्लास हळदीच्या दुधात 'हा' पदार्थ मिसळून रात्री प्या-५ आजार होतील दूर; शांत झोप येईल

१ ग्लास हळदीच्या दुधात 'हा' पदार्थ मिसळून रात्री प्या-५ आजार होतील दूर; शांत झोप येईल

Benefits Of Drinking Milk With Ghee And Turmeric : आयुर्वेदात अनेक उपचारांमध्ये दूधासोबत तूप आणि हळद मिसळून याचे सेवन केले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 04:31 PM2024-10-08T16:31:55+5:302024-10-08T18:01:04+5:30

Benefits Of Drinking Milk With Ghee And Turmeric : आयुर्वेदात अनेक उपचारांमध्ये दूधासोबत तूप आणि हळद मिसळून याचे सेवन केले जाते.

Health Benefits Of Drinking Milk With Ghee And Turmeric At Night | १ ग्लास हळदीच्या दुधात 'हा' पदार्थ मिसळून रात्री प्या-५ आजार होतील दूर; शांत झोप येईल

१ ग्लास हळदीच्या दुधात 'हा' पदार्थ मिसळून रात्री प्या-५ आजार होतील दूर; शांत झोप येईल

आयुर्वेदात अनेक समस्या नैसर्गिक पद्धतीने दूर करता येतात. घरात पडलेल्या मसाल्यांपासून छोटी, छोटी रोपं, फूल आणि पानांनी गंभीर समस्या टाळता येतात. आयुर्वेदात अनेक उपचारांमध्ये दूधासोबत तूप आणि हळद मिसळून याचे सेवन केले जाते. हा एक आयुर्वेदीक उपाय आहे. याच्या सेवनानं गंभीर समस्या टाळता येतात. दुधात हळद मिसळून प्यायल्यानं गंभीर समस्या टाळण्यास मदत होते. (Health Benefits Of Drinking Milk With Ghee And Turmeric At Night)

पचनाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी दूध आणि हळदीसोबत तूप मिसळून पिणं फायदेशीर ठरतं. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. याशिवाय गॅस, एसिडीटीची समस्या उद्भवत नाही. इतकंच नाही तर याचे सेवन केल्यानं मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते. 

स्मिता श्रीवास्तव यांच्या ७ फुट ९ इंचाच्या केसाचं खास सिक्रेट; दाट केसांसाठी 'हा' पदार्थ लावतात

दूधात कॅल्शियमचे प्रमाण  जास्त असते. यामुळे तुमची मजबूत हाडं मजबूत होतात.  तुपाच्या सेवनानं ज्वाईंट्स चांगले राहतात. तुपात व्हिटामीन के२ असते.  जो एक मुख्य घटक आहे. नियमित स्वरूपात या ड्रिंकचे सेवन झोपण्याच्या आधी करायला हवं. ज्यामुळे सांधेदुखीच्या समस्या टाळण्यास मदत होते. 

बदलत्या वातावरणात सर्दी, खोकल्याचा त्रास कमी करण्यासााठी तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन करू शकता. झोपण्याच्या आधी १ ग्लास गरम दुधात चुटकीभर हळद घालून प्या. ज्यामुळे अस्वस्थता कमी होते.  याशिवाय घश्यातील खवखव दूर होते.  दुधात हळद, तूप मिसळून प्यायल्यानं त्वचेवर चमक येते. हे कॉम्बिनेशन काही लोकांसाठी उत्तम ठरते.

तूप आणि दूधाचे नियमित सेवन केल्यानं त्वचा आतून चमकते. यामुळे त्वचेवरचे डागही कमी होतात. हळदीच्या दुधात तूप मिसळून प्यायल्यानं सूज, वेदना दूर होतात आणि त्रासापासून आराम मिळतो. यातील गुण वेदना कमी करतात. हळदीत एंटी इफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे सूज कमी होते आणि आराम मिळतो.

आईबाबांनी ‘या’ ४ गोष्टी केल्या तर मुली होतात खंबीर, जन्मभर राहतील आनंदात

बदलत्या वातावरणात खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन करू शकता.  झोपण्याआधी १ ग्लास दूधात तूप आणि चिमूटभर हळद मिसळून याचे सेवन करा. ज्यामुळे अस्वस्थता कमी होते,  ज्यामुळे खोकला दूर होतो. 

Web Title: Health Benefits Of Drinking Milk With Ghee And Turmeric At Night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.