Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोजच्या जेवणात असायलाच हवा लसूण; ५ फायदे, स्वादासोबतच तब्येतीसाठी उपयुक्त, राहाल ठणठणीत...

रोजच्या जेवणात असायलाच हवा लसूण; ५ फायदे, स्वादासोबतच तब्येतीसाठी उपयुक्त, राहाल ठणठणीत...

Health Benefits Of Garlic : पाहूयात लसणाचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2023 04:11 PM2023-02-26T16:11:40+5:302023-02-26T16:23:48+5:30

Health Benefits Of Garlic : पाहूयात लसणाचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात.

Health Benefits Of Garlic : Garlic must be in daily food; 5 benefits, useful for health along with taste, will stay Healthy... | रोजच्या जेवणात असायलाच हवा लसूण; ५ फायदे, स्वादासोबतच तब्येतीसाठी उपयुक्त, राहाल ठणठणीत...

रोजच्या जेवणात असायलाच हवा लसूण; ५ फायदे, स्वादासोबतच तब्येतीसाठी उपयुक्त, राहाल ठणठणीत...


लसूण हा मसाल्याच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ. एखाद्या पदार्थाची ग्रेव्ही करण्यासाठी तर कधी फोडणी देण्यासाठी आपण लसणाचा स्वयंपाकात वापर करतो. लसणाचा स्वाद थोडा उग्र असला तरी त्यामुळे जेवणाला चव येत असल्याने आपण स्वयंपाकात आवर्जून लसणाचा वापर करतो. लसणाची चटणी, ठेचा हे तर जेवणाची रंगत वाढवणारे पदार्थ. हा लसूण आपण चवीसाठी आणि स्वादासाठी पदार्थांमध्ये वापरतोच, पण आरोग्य उत्तम राहावं यासाठीही लसणाचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. जेवणाची चव वाढवणारा हा लसूण वैद्यकीय उपचारांसाठीही फायद्याचा असतो हे आपल्याला माहित असतेच असे नाही. पण उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि विविध प्रकारची इन्फेक्शन्स यासाठी लसूण उपयुक्त असतो. पाहूयात लसणाचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात (Health Benefits Of Garlic).

१. रक्तदाब नियंत्रणात ठेवणे 

ज्यांना हायपरटेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशांना हा त्रास नियंत्रणात राहण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. लसणामध्ये सल्फरचा घटक असल्याने रक्तवाहिन्यांवर त्याचा अतिशय चांगला परीणाम होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास उपयुक्त 

रक्तातील एकूण कोलेस्टेरॉलची पातळी आणि बॅड कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी लसूण फायदेशीर असतो. लिव्हरमधील कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास लसूण उपयुक्त असल्याने हे काम सोपे होते. 

३. प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत 

लसणामध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याने विविध प्रकारच्या बॅक्टेरीयल आणि व्हायरल इन्फेक्शन्सपासून बचाव करण्यासाठी लसूण उपयुक्त असतो. तसेच काही अभ्यासांनुसार इम्युन सेल्सची अॅक्टीव्हिटी वाढवण्याचे काम लसणातील घटक करतात त्यामुळे एकूण प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 

४. मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत 

आपली स्मृती आणि लक्ष देण्याची क्षमता या दोन्ही गोष्टींकडे योग्य पद्धतीने लक्ष देण्यासाठी लसूण महत्त्वपूर्ण काम करतो. त्यामुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते. म्हणून मेंदूच्या कार्यासाठी लसूण फायदेशीर असतो. 

(Image : Google)
(Image : Google)

५. अँटीकॅन्सर प्रॉपर्टीज

कॅन्सर ही सध्या अतिशय मोठी समस्या झाली असून विविध प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे. विशेषत: पोटाचा, कोलन कॅन्सर यांसारखे कॅन्सर बरे होण्यासाठी लसूण उपयुक्त ठरतो.  

Web Title: Health Benefits Of Garlic : Garlic must be in daily food; 5 benefits, useful for health along with taste, will stay Healthy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.