Join us   

कोलेस्टेरॉल, शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील; मधाचा असा करा वापर, थंडीत आजारांपासून लांब राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 7:34 PM

Health benefits of honey to control diabetes : टोरंटो युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, मध कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

मध त्वचेसह, तब्येतीसाठीही खूप फायदेशीर आहे. मध खाल्ल्यानं आजारांवर नियंत्रण ठेवता येतं. मधामध्ये असलेले पोषक तत्व मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल सारख्या गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. यामध्ये प्रथिने, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-कार्सिनोजेनिक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. (Health benefits of honey to control diabetes and cholesterol health tips)

 ज्यामुळे हृदय आणि मधुमेहासारख्या आजारांचा धोका दूर होतो. टोरंटो युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, मध कार्डिओमेटाबॉलिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. संशोधनानुसार, मध रक्तातील साखर नियंत्रित करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. (How to control cholesterol)

शुगर नियंत्रणार राहते

मधाच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो. मध गोड असणं मधुमेहात किती फायदेशीर ठरू शकतं याबद्दल प्रत्येकजण गोंधळून जातो. वास्तविक, मधामध्ये असलेले पोषक तत्व ग्लुकोज नियंत्रित करण्याचे काम करतात. यामुळे गोड खाण्याचे  क्रेव्हिंग्सही रोखले जातात. मधाच्या सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहतो.

मधामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करतात. जर तुम्हाला कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटत असेल तर एक चमचा मधासोबत कच्चा लसूण खाणे खूप फायदेशीर ठरेल. हे दोन्ही कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे काम करतात आणि हृदयासाठी फायदेशीर असतात.

सेवन कसे करावे

दररोज एक चमचा (35-40) ग्रॅम मध सेवन करणे फायदेशीर आहे. चहामध्ये साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास खूप फायदा होईल. हेल्दी काढ्यामध्ये मध मिसळूनही तुम्ही सेवन करू शकता. डायबिटीस, कोलेस्ट्रॉल याशिवाय इतर अनेक आजारांवर मध फायदेशीर आहे. मध पचन, सर्दी, घशातील समस्या, लठ्ठपणा यांसारख्या समस्या दूर करण्याचे काम करते. मध खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. केस आणि त्वचेसाठीही हे फायदेशीर आहे.

टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइल