शरीरातला रक्तप्रवाह सुधारण्यासाठी, त्वचेसंबंधी, आरोग्यासंबंधीच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी शरीराला मालिश करणं (benefits of body massage) फायदेशीर ठरतं. शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना मालिश केल्यास वेगवेगळे फायदे मिळतात. डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत मालिश करण्याचे आरोग्यास मौलिक फायदे मिळतात. मालिश करण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा, आयुर्वेदिक तेलांचा उपयोग केला जातो. पण घरी तयार करण्यात येणाऱ्या साजूक तुपानं मालिश केल्यानेही (massage with desi ghee) विविध फायदे होतात. हाता पायाच्या तळव्यांना साजूक तुपानं मालिश करण्याला विशेष महत्व आहे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट साजूक तुपानं हाताच्या तळव्यांना मालिश केल्यास (benefits of massage palm with desi ghee) छोट्या मोठ्या आजारांचा धोका सहज टाळता येतो.
आयुर्वेदानुसार साजूक तुपात अनेक औषधी गुणधर्म असतात. शरीराला आवश्यक पोषक गुणधर्माचा खजिना साजूक तुपात असतो. साजुक तुपात शरीरास फायदेशीर हेल्दी फॅटस, अ, क, ड, के जीवनसत्वं आणि खनिजं असतात. साजूक तुपानं हाताच्या तळव्यांना मालिश केल्यास त्वचा निरोगी होण्यापासून शांत झोप येण्यापर्यंत अनेक फायदे मिळतात.
Image: Google
साजूक तुपानं हाताच्या तळव्यांना मालिश केल्यास..
1. कामं करुन हाताची त्वचा राठ आणि कडक होते. बोटांची त्वचा खरबरीत होते. साजूक तुपानं हातांना मालिश केल्यास हाताची त्वचा मऊ मुलायम होते.
2. साजूक तुप हातावर घेऊन ते दोन्ही हातांनी चोळून मालिश केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. शरीराच्या सर्व अवयवांना रक्ताचा आणि पोषक घटकांचा चांगला पुरवठा होतो.
3. शरीरात वात दोष बिघडल्यास गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो. पण झोपण्यापूर्वी साजूक तुपानं हाताच्या तळव्यांना मालिश केल्यास शरीरातील वात दोष संतुलित राखण्यास मदत होते.
4. हाताच्या तळव्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्युप्रेशर पाॅइंट्स असतात. साजूक तुपानं हाताच्या तळव्यांची मालिश केल्यास हे ॲक्युप्रेश पाॅइंटस दाबले जातात. शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी हाताच्या तळव्यांना तुपाची मालिश करणं फायदेशीर ठरतं.
Image: Google
हाताच्या तळव्यांना तुपानं मालिश कशी करावी?
साजूक तुपानं हाताच्या तळव्यांना मालिश करणं सोपं सहज काम आहे. यासाठी वाटीत थोडं साजूक तूप घ्यावं. ते कोमट करावं. कोमट तूप हाताच्या तळव्यांना आधी लावून मग हळूहळू हाताचे तळवे एकमेकांवर घासावे. अशा प्रकारे 8- 10 मिनिटं साजूक तुपानं हाताच्या तळव्यांना मालिश केल्यानं आरोग्यास फायदे मिळतात.