Join us   

आहारात रव्याचे पदार्थ नियमित खाण्याचे ४ फायदे- वजन कमी होते-ब्लडप्रेशरही राहते नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2023 11:43 AM

Health Benefits of Semolina Flour - Is It Gluten-Free? काय सारखा सारखा उपमा म्हणून नाकं मुरडत असाल तर वाचा आहारात रव्याचे पदार्थ खाण्याचे महत्त्व

रवा हा रोजच्या आहारातील पदार्थ आहे. रव्याचे अनेक पदार्थ केले जातात. रव्याचा अनेक पदार्थात वापर देखील होतो. रव्याचा उपमा, रव्याचा गोड शिरा आपण खातोच. इन्स्टंट पदार्थ करण्यासाठी रव्याचा वापर होतोच. सध्या लोकं रव्याचा डोसा, इडली, ढोकळा करतात. पण रव्याचे आरोग्यदायी फायदे आपल्याला माहिती आहेत का? रवा आरोग्यासाठी का उत्तम आहे हे पाहूयात(Health Benefits of Semolina Flour - Is It Gluten-Free?).

रवा हा पोषक तत्वांचा खजिना

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या डेटानुसार 'रवा हा कॅलरीज, कार्ब्स, प्रोटीन, थायामिन, फायबर, फोलेट, रिबोफ्लेविन, लोह, मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आहे. हे सर्व पोषक तत्व आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी आहारात रव्याच्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचं आहे. यासह रवा वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते.'

रवा खाण्याचे ४ आरोग्यदायी फायदे

हृदयाचे आरोग्य सुधारते

हेल्थ शॉट्स या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, रव्यामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यासह एलडीएल कोलेस्टेरॉल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल, व ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पबमेड सेंट्रलने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार रव्याचे नियमित सेवन हृदयाशी संबंधित आजारांशी लढण्यास मदत करते.

ब्लड प्रेशरची पातळी नियंत्रणात ठेवते

पब मेड सेंट्रलच्या मते, रवा मॅग्नेशियम आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे. जे रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करतात. फायबर रक्तप्रवाहातील कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करते, ज्यामुळे रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होत नाही.

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे, आरोग्यासाठी वरदान म्हणजे शेवगा

पचनसंस्था सुधारते

फायबर युक्त रवा पाचन तंत्र संतुलित ठेवते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, रवा पचनमार्गातील आतड्यांसंबंधीत समस्या सोडवण्यास मदत करते. यासह गट फ्रेंडली बॅक्टीरियाच्या वाढीस मदत करते. ज्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी पचनाच्या संबंधित समस्यांचा त्रास कमी होतो.

वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

जर आपण वेट लॉस करत असाल तर, रव्यापासून तयार पदार्थ खा. पोषक तत्वांनी परिपूर्ण रवा आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. रवा हा थायामिन, फोलेट आणि बी जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत आहे. रव्याचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला बराच काळ भूक लागत नाही. पोट भरलेले राहते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहते.

आहारात रव्याचा समावेश कसा करावा?

- आपण रव्याचा वापर चपाती, चिला असे पदार्थ करण्यासाठी करू शकता.

- दाक्षिणात्य पदार्थ करण्यासाठी आपण रव्याचा वापर करू शकता. रव्याचा डोसा, इडली, उपमा असे पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतात.

३ महिने रोज ३ ग्रॅम जिरे खाण्याचे ५ भन्नाट फायदे, वजनही घटेल आणि...

- आपल्या जर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली असेल तर, रव्याचा गोड शिरा किंवा खीर करून खा. परंतु, साखरेऐवजी त्यात गुळाचा वापर करा.

- स्नॅक्समध्ये आपण रव्याचे कुकीज, केक किंवा ब्रेड तयार करून खाऊ शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न