Join us   

हाडांना पोखरते व्हिटामीन B-12 ची कमी; रोज 'या' डाळीचं पाणी प्या, व्हिटामीन बी-१२ भरपूर मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 2:52 PM

Health Benefits Of Socked Moong Dal : व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे एनिमिया, थकवा, कमकुवतपणा उद्भवतो.

व्हिटामीन बी-१२ (Vitamin B-12) एक असं तत्व आहे जे डिएनए तयार होण्यापासून शरीरात उर्जा निर्माण होण्यास आवश्यक असते. या व्हिटामीनच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. व्हिटामीन बी-१२ च्या कमतरतेमुळे एनिमिया, थकवा, कमकुवतपणा उद्भवतो. याव्यतिरिक्त शरीरात सूजसुद्धा येऊ लागते. काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही व्हिटामीन्सची कमतरता भरून काढू शकता. (Health Benefits  Of Socked Moong Dal Water Vitamin B-12 deficiency)

व्हिटामीन बी-12 ची कमतरता कशी पूर्ण करावी

व्हिटामीन बी-12 ची कमतरता पूर्ण करण्याासाठी आहार स्त्रोत आणि लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करणं फार महत्वाचं असतं. व्हिटामीन बी-12  शाकाहारी पदार्थांमध्ये कमी प्रमाणात असते असा अनेकांचा समज आहे. पण किचनमध्ये आढळणाऱ्या काही पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही  व्हिटामीन्स भरपूर मिळवू सकता. प्रत्येकाच्याच स्वंयपाकघरात डाळी असतात. डाळी खाल्ल्यानं शरीराला आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व मिळतात.

आहारतज्ज्ञ नमामी अग्रवाल सांगतात की शरीरात व्हिटामीन्सची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुगाच्या डाळीचं पाणी पिऊ शकता. या डाळीत व्हिटामीन बी-१२ भरपूर प्रमाणात असते. रोज या डाळीचे सेवन केल्यानं व्हिटामीन्स ची कमतरता दूर होण्यास मदत होते.  रात्री झोपण्याआधी एक कप मूगाची डाळ व्यवस्थित धुवून साफ करून घ्या आणि पाण्यात भिजवा. सकाळी ही डाळ व्यवस्थित भिजल्यानंतर तुम्ही या पाण्याचे सेवन करू शकता. याव्यतिरिक्त उरलेल्या डाळीत कांदा, लिंबू घालून याचे सेवन करू शकता. 

मुगाच्या डाळीत कोणती पोषक मुल्य असतात?

रेडक्लिफलॅब्सच्या रिपोर्टनुसार मुगाच्या डाळीत एंटी डायबिटीक गुण असतात  ज्यामुळे ब्लड प्रेशर कमी होण्यास मदत होते, यात एंटी इफ्लामेटरी गुणधर्म असतात. अनेक वर्षांपासून हिरवी मुगाची डाळ पारंपारीक उपाय म्हणून वापरली जात आहे. यात डिटॉक्सिफाययिंग गुणधर्म असतात ज्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारण्यास मदत होते.  हिट स्ट्रोक, पचनाचे विकार यांपासून बचाव होतो. हिरवी मुगाची डाळ आयर्न चा चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे रेड ब्लड सेल्स वाढवण्यास मदत होते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल