Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री जेवल्यानंतर लगेच झोपता? ही सवय बदला लगेच बदला, जेवणानंतर १० मिनिटं तरी..

रात्री जेवल्यानंतर लगेच झोपता? ही सवय बदला लगेच बदला, जेवणानंतर १० मिनिटं तरी..

रात्री जेवल्यानंतर (after dinner) एका जागी बसून राहाणं, झोपणं ही आरोग्यासाठी घातक सवय आहे. जेवल्यानंतर फिरल्यानं (walk after dinner) रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, गॅस्ट्रिक या समस्यांचा (benefits of walk after dinner) धोका सहज टाळता येतो. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 04:57 PM2022-08-19T16:57:30+5:302022-08-19T17:05:44+5:30

रात्री जेवल्यानंतर (after dinner) एका जागी बसून राहाणं, झोपणं ही आरोग्यासाठी घातक सवय आहे. जेवल्यानंतर फिरल्यानं (walk after dinner) रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, गॅस्ट्रिक या समस्यांचा (benefits of walk after dinner) धोका सहज टाळता येतो. 

Health benefits of walking after dinner | रात्री जेवल्यानंतर लगेच झोपता? ही सवय बदला लगेच बदला, जेवणानंतर १० मिनिटं तरी..

रात्री जेवल्यानंतर लगेच झोपता? ही सवय बदला लगेच बदला, जेवणानंतर १० मिनिटं तरी..

Highlightsरात्री जेवल्यानंतर 1 तासाच्या आत चालायला जाणं आवश्यक आहे. जेवणानंतर सुरुवातीला 10-20 मिनिटं चालावं. हा वेळ अर्ध्या तासापर्यंत वाढवता येतो.   

आपल्या  चांगल्या वाईट जीवनशैलीचा (life style effects)  परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अर्थातच जीवनशैली दोषपूर्ण असेल तर आरोग्यावर होणारे परिणाम नकारात्मकच असतात. आरोग्यावर परिणाम करणारी अशीच एक वाईट सवय म्हणजे रात्री जेवल्यानंतर लगेच झोपणे, एका जागी बसून राहाणे . या वाईट सवयीचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपण्याची, बसून राहाण्याची ही सवय लगेच बदलण्याचा सल्ला हैद्राबाद येथील कामिनेनी हाॅस्पिटलचे जनरल फिजिशियन आणि मधुमेहतज्ज्ञ डाॅ. मुक्शीथ कादरी देतात. त्यांच्या मते  रात्रीच्या जेवणानंतर चालायला गेल्यास (walk after dinner)  रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, गॅस्ट्रिक या आजारांचा धोका (benefits of walk after dinner)  सहज टाळता येतो. डाॅ. मुक्शीथ कादरी हे रात्रीच्या जेवणानंतर चालण्याचे फायदे, कधी आणि किती वेळ चालावं याबाबतीत सविस्तर माहिती देतात. 

Image: Google

रात्री जेवल्यानंतर चालण्याचे फायदे

1. रात्री जेवल्यानंतर चालायला गेल्यास पचन क्रिया सुधारते. गॅसेस, अपचन, बध्दकोष्ठता या समस्या दूर राहातात.

2. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी रात्री जेवल्यानंतर अवश्य फिरायला हवं. ज्या लोकांमध्ये स्थूलतेची समस्या असते त्यांच्यासाठी रात्री जेवणानंतर चालणं हे औषधासारखं काम करतं. 

3. रात्री जेवणानंतर चालण्यानं चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळेही वजन नियंत्रित राहाण्यास , कमी होण्यास मदत होते. 

4. जेवल्यानंतर चालण्याच्या सवयीमुळे पचन सुधारतं आणि त्याचा परिणाम रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी होतो. जेवल्यानंतर थोडा वेळ चालण्यामुळे शरीरातील अवयव सुदृढ राहातात. पचन करण्यासाठी आतड्यांवर जास्त ताण येत नाही, यासाठी आतड्यांना जास्त कष्ट करावे लागत नाही. 

5. रात्री जेवल्यानंतर चालण्यामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन स्त्रवतं. हे हार्मोन पुरेस्ं स्त्रवल्यामुळे तणाव कमी होतो. 

6. जेवल्यानंतर चालण्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. रक्तप्रवाहात येणारे अडथळे दूर होतात. 

7. मधुमेही रुग्णांसाठी रात्री जेवणानंतर चालणं ही आरोग्यदायी सवय आहे. जेवणानंतर चालण्यामुळे रक्तातील साखर संतुलित राहाते.

Image: Google

जेवणानंतर कधी चालावं- किती चालावं?

रात्री जेवल्यानंतर लगेच चालल्यास पचनाला मदत होते. थकवा कमी होतो. शरीरातील कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणानंतर एक तासाच्या आत चालायला जाणं आवश्यक आहे.  जेवल्यानंतर 10 ते 20 मिनिटं चालणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं. हा वेळ वाढवत जाऊन अर्धा तास केल्यास त्याचे चांगले फायदे मिळतात.  तसेच रात्रीच्या जेवणानंतर घराबाहेरच चालायला हवं असं नाही. घरातल्या घरात चालण्याचेही फायदे मिळतात. 
 

Web Title: Health benefits of walking after dinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.