Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सोन्याहून पिवळे हळदीचे गुण, गंभीर 7 आजारांत परिणामकारक औषध! रिसर्चचा दावा, हळदीची हवा

सोन्याहून पिवळे हळदीचे गुण, गंभीर 7 आजारांत परिणामकारक औषध! रिसर्चचा दावा, हळदीची हवा

देश परदेशात हळदीवर अनेक अभ्यास झाले आहेत. अजूनही पाश्चात्य देशातल्या वैद्यकीय संस्थामधे, युनिर्व्हसिटीजमधे हळदीच्या गुणधर्मावर आणि हे गुणधर्म कोणकोणत्या आजारांवर किती परिणामकारक आहे यावर अभ्यास आणि संशोधन सुरु आहे. आतापर्यंत अनेक अभ्यास आणि त्यावरचे निष्कर्ष प्रसिध्द झाले आहेत. या निष्कर्षांनी अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं आहे. जी आपल्या खूप परिचयाची आहे ती आपल्यासाठी किती अनोळखी आहे हे हळदीबद्दलचे निष्कर्ष वाचल्यावर नक्कीच जाणवतं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 04:50 PM2021-11-20T16:50:07+5:302021-11-20T17:08:51+5:30

देश परदेशात हळदीवर अनेक अभ्यास झाले आहेत. अजूनही पाश्चात्य देशातल्या वैद्यकीय संस्थामधे, युनिर्व्हसिटीजमधे हळदीच्या गुणधर्मावर आणि हे गुणधर्म कोणकोणत्या आजारांवर किती परिणामकारक आहे यावर अभ्यास आणि संशोधन सुरु आहे. आतापर्यंत अनेक अभ्यास आणि त्यावरचे निष्कर्ष प्रसिध्द झाले आहेत. या निष्कर्षांनी अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं आहे. जी आपल्या खूप परिचयाची आहे ती आपल्यासाठी किती अनोळखी आहे हे हळदीबद्दलचे निष्कर्ष वाचल्यावर नक्कीच जाणवतं.

Health Benefits of Turmeric: Turmeric has gold value in reference of health. Turmeric is beneficial in 7 diseases. | सोन्याहून पिवळे हळदीचे गुण, गंभीर 7 आजारांत परिणामकारक औषध! रिसर्चचा दावा, हळदीची हवा

सोन्याहून पिवळे हळदीचे गुण, गंभीर 7 आजारांत परिणामकारक औषध! रिसर्चचा दावा, हळदीची हवा

Highlights हळदीमधे सूज आणि दाह कमी करण्याचे गुणधर्म असतात. म्हणूनच कोलायटिस सारख्या आतड्यांच्या गंभीर आजारातही हळदीची परिणामकारकता दिसून आली.  हळदीमधील अँण्टिऑक्सिडण्टस घटक मेंदूमधील स्मरणशक्ती अणि विचार करण्याची क्षमता यावर परिणाम करणार्‍या भागातील सूज कमी करतो. हळदीचे सूज कमी करण्याचे आणि पेशी ज्वलन रोखण्याचे गुणधर्म हदयविकाराचा धोका टाळण्यासही मदत करतात.

जे आपल्याकडे असतं त्याची आपल्या किंमत नसते. पण बाहेरुन कोणी सांगितलं की हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे म्हटलं की त्याचं महत्त्व पटतं. अगदी तसंच हळदीच्या बाबतीत झालं आहे. हळद आपण रोज स्वयंपाकात वापरतो. पण मसाला म्हणून. हीच हळद किती औषधी आहे हे आपल्याला आपल्या घरातल्या जेष्ठांनी सांगितलेलं असतं. पण तरीही आपण हळद वापरतो ती एक मसाल्याची सामग्री म्हणूनच. आणि ती वापरतांनाही स्वयंपाकात का वापरावी? किती वापरावी? याचं कारण काय हे शोधण्याच्या, समजून घेण्याच्या फंदात आपण पडत नाही. पण हे समजून घेतल्यास आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यातील एक चमचा हळद आपल्याला सोन्याच्या मोलाची वाटेल हे नक्की.
देश परदेशात हळदीवर अनेक अभ्यास झाले आहेत. अजूनही पाश्चात्य देशातल्या वैद्यकीय संस्थामधे, युनिर्व्हसिटीजमधे हळदीच्या गुणधर्मावर आणि हे गुणधर्म कोणकोणत्या आजारांवर किती परिणामकारक आहे यावर अभ्यास आणि संशोधन सुरु आहे. आतापर्यंत अनेक अभ्यास आणि त्यावरचे निष्कर्ष प्रसिध्द झाले आहेत. या निष्कर्षांनी अख्ख्या जगाचं लक्ष वेधलं आहे. जी आपल्या खूप परिचयाची आहे ती आपल्यासाठी किती अनोळखी आहे हे हळदीबद्दलचे निष्कर्ष वाचल्यावर नक्कीच जाणवतं. अमेरिकेतील क्लेव्हलॅण्ड क्लिनिकमधील आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर्स, युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅनफ्रॅन्सिसको मधील स्कॉलर्स यांनी केलेल्या अभ्यासातून हळदीच्या गुणधर्मांची आजारातील परिणामकारकता यावरचे निष्कर्ष समोर आले आहेत. हे निष्कर्ष आपल्या मसाल्याच्या डब्यातील एक चमचा हळदीच्या गुणधर्मातील औषधी परिणामकारकतेवर प्रकाश टाकतात. हळद ही साध्या सर्दी खोकल्यापासून हदयविकार, कॅन्सरसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी परिणामकारक आहे. हळदीमधील औषधी गुणधर्माचे हे निष्कर्ष वाचल्यानंतर आपल्या मसाल्याच्या डब्यातील आरोग्याच्या दृष्टीने सोन्याच्या मोलाची हळद आपण यापुढे नक्कीच अधिक डोळसपणे वापरु!

Image: Google

हळदीचे गुणधर्म 7 आजारांवर परिणामकारक

1. सूज कमी करते- जुन्या गंभीर आजारांमधे निरनिराळ्या कारणांनी सूज जेव्हा वाढते तेव्हा शरीरातील पेशींवर त्याचा परिणाम व्हायला लागतो. क्लेव्हलॅण्ड क्लिनिकमधील आहारतज्ज्ञांनी अभ्यास करताना अल्सर कोलायटिस झालेल्या रुग्णावर हळदीमधी गुणधर्मानं कसा परिणाम केला हे दाखवून दिलं आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांसोबत रुग्णाला दोन ग्रॅम क्युरक्युमिन ( क्युरक्युमिन हा हळदीमधील प्रमुख गुणधर्म आहे) दिवसातून एक्दा सेवन करण्यास सांगितलं. त्याचा चांगला परिणाम त्या रुग्णामधे दिसून आल्याचं अभ्यासक सांगतात. कोलायटिस आणि अल्सरमुळे आलेली आतड्यांची सूज क्युरक्युमिनच्या सेवनानं कमी झालेली आढळली. हळ्दीमधे सूज आणि दाह कमी करण्याचे गुणधर्म असतात.

Image: Google

2. स्मरणशक्ती वाढवते- हळदीमधील क्युरक्युमिन हा घटक स्मरणशक्ती वाढवण्यासही उपयुक्त आहे, हे सांगतांना अभ्यासकांनी आपल्या प्रयोगाची माहिती दिली आहे. त्यांनी निरोगी मध्यमवयीन प्रौढ ज्यांची स्मरणशक्ती कमी झाली ( त्यांना विस्मरणाचा आजार नसतांनाही) त्यांना 18 महिने 90 मिलिग्रॅम क्युरक्युमिन दिवसातून दोन वेळा सेवन करण्यास सांगितलं. असता त्यांची स्मरणशक्ती वाढलेली दिसून आली. याचं कारण सांगतांना संशोधक आणि अभ्यासक सांगतात की, क्युरक्युमिनमधील अँण्टिऑक्सिडण्टस घटक मेंदूमधील स्मरणशक्ती अणि विचार करण्याची क्षमता यावर परिणाम करणार्‍या भागातील सूज कमी करतो. अल्झायर्मस या आजारात उपचार म्हणून क्युरक्युमिनची भूमिका किती महत्त्वाची आहे आता या अंगाने हळदीतील गुणधर्माचा अभ्यास सुरु आहे.

3. वेदना कमी करते- संशोधक सांगतात की संधिवाताच्या रुग्णांना त्यांच्या या आजारावरील औषधांसोबतच हळदीचा अर्क स्नियमित दिला असता संधिवातामुळे सांध्यांना आलेली सूज आणि सांध्यांना होणार्‍या वेदना आणि दाह कमी झाल्याचं संशोधनातून आढळून आलं. हळदीतील याच गुणधर्मामुळे आयुर्वेदात प्राचीन काळापासून आणि चीनपमधील पारंपरिक औषधांमधे हळदीचा औषध म्हणून समावेश केला आहे. हळदीतील गुणधर्म सूज आणी दाह कमी करण्यासोबतच वेदना शमवण्याचंही काम करतात.

4. कॅंन्सरचा धोका होतो कमी- हळदीमधे अँण्टिऑक्सिडण्टस घटक असतात. यावरचा अभ्यास सांगतो की हळदीमधील हे अँण्टिऑक्सिडण्टस शरीरातील मुक्त मुलाकांना विरोध करतात. शरीरातील अँण्टिऑक्सिडण्टस आणि मुक्त मुलक ( हानिकारक पेशी) यांच्यात असंतुलन निर्माण होणं हे कर्करोगाचं कारण सांगितलं जातं. अभ्यास सांगतो की हळदीतील गुणधर्म पेशींचं ज्वलन होण्यापासून रोखतात. पेशींचं ज्वलन झाल्यास शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होवून अँण्टिऑक्सिडण्टस आणि मुक्त मुलक यांच्यात असंतुलन होऊन शरीरात कर्करोग विकसित होतो. तसेच हळदीच्या गुणधर्मावर झालेला आणखी एक अभ्यास सांगतो की हळदीमधील अँण्टिऑक्सिडण्टस शरीरातील इतर अँण्टिऑक्सिडण्टसना कार्यप्रेरित करतात. त्यामुळेही शरीरात कॅन्सर पेशींची वाढ होण्याचा धोका टळतो.

Image: Google

5. हदयरोगाचा धोका टळतो- हळदीचे सूज कमी करण्याचे आणि पेशी ज्वलन रोखण्याचे गुणधर्म हदयविकाराचा धोका टाळण्यासही मदत करतात.अभ्यास सांगतो मध्यम वयीन आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या निरोगी लोकांना 12 आठवडे क्युरक्युमिन सप्लिमेण्टस दिल्या असता त्यांच्या रक्तवाहिन्यांमधे एन्डोथेलिअल या हानिकारक पेशींची वाढ झाली नसल्याचं आढळून आलं. रक्तवाहिन्यात एंडोथेलिअल पेशींची वाढ ही हदयरोगास, उच्च रक्तदाबास कारणीभूत असते. त्यामुळे हळदीतील गुणधर्म हदयविकार रोखण्यासही प्रभावी ठरतात असं अभ्यास सांगतो.

6. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते- डॉक्टरांनी लिहून दिलेल्या गोळ्यांसोबतच हळद सेवन केल्यास कोलेस्टेरॉल वाढलेल्या रुग्णांमधे त्याची पातळी कमी झाल्याचं आढळून आलं. कोलेस्टेरॉलची पातळी हळदीच्या गुणधर्मांमुळे नेमकी किती कमी होते यावर अभ्यास सुरु आहे. पण कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यास हळदीचा उपयोग होतो असं अभ्यास सांगतो.

Image: Google

7. नैराश्य या आजारावरही उपयुक्त- आपल्या मेंदूत ब्रेन डेरिव्हड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर नावाचं प्रथिनं असतं. जे बीडीएनएफ म्हणून ओळखलं जातं. ते जर कमी झालं तर स्मरणशक्ती आणि नवीन काही शिकण्याची क्षमता निर्माण करणारा मेंदूतील भाग आंकुचन पावतो. पण हळदीमधील क्यूरक्यूमिन हा घटक बीडीएनएफ या प्रथिनाची पातळी वाढवते. याच गुणधर्मामुळे नैराश्य आजारावरील औषधात क्युरक्युमिन हा घटक वापरला तर मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइन या दोन संप्रेरकाची पातळी वाढण्यास मदत होईल असं संशोधक म्हणतात. मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यास म्हणूनच हळद ही महत्त्वाची मानली जाते.

अभ्यास आणि संशोधनातून पुढे आलेले हळदीतील औषधी परिणामकारतेचे निष्कर्ष हे खूपच महत्त्वाचे आहेत. यामुळे हळदीचा विचार स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्याच्या पलिकडे करण्यास नक्कीच मदत होईल आणि स्वयंपाकातही हळदीचा वापर आणखी डोळसपणे होईल.
 

Web Title: Health Benefits of Turmeric: Turmeric has gold value in reference of health. Turmeric is beneficial in 7 diseases.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.