Join us   

मुलांसाठी दूधात घालण्याची शक्तीवर्धक पावडर म्हणजे विकतचं दुखणं? दूध पिण्याचा हट्ट पडेल महागात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2024 4:46 PM

Do Health Drinks In Market Really Work For Kids?: मुलांनी दूध प्यावं म्हणून बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या पावडर आणायच्या आणि दूधात टाकून मुलांना द्यायच्या असं तुम्हीही करत असाल तर एकदा हे वाचा...

ठळक मुद्दे बहुतांश मुलांना नुसत्या दूधाची चव आवडत नाही. पण आपल्या मुलामुलींनी दूध प्यायलाच पाहिजे हा आईचा अट्टाहास असतो.

मुलांनी दूध प्यायलाच पाहिजे. त्यांच्या आरोग्यासाठी, हाडांच्या बळकटीसाठी दूध अतिशय महत्त्वाचं आहे हे आपल्या डोक्यात खूप जास्त बिंबवलं गेलं आहे. पुर्वीपासून आपल्याकडे लहान मुलांना दूध देतात. पण त्याकाळची दुधाची शुद्धता आणि आता त्यात होत असलेली भेसळ यात खूप जास्त अंतर आहे. त्यामुळे आता तर बरेच आहारतज्ज्ञ असंही सुचवतात की मुलं दूध पित नसतील तर त्यांना अजिबात देऊ नका. कारण मुलांनी दूध नाही प्यायलं तर त्यांच्या आरोग्यावर असा कोणताही वाईट परिणाम होत नाही. पण तरीही ही गोष्ट बऱ्याच आई लोकांच्या पचनी पडत नाही. मुलांनी दूध प्यायलाच पाहिजे असा त्यांचा हट्ट असतो.

 

बहुतांश मुलांना नुसत्या दूधाची चव आवडत नाही. पण आपल्या मुलामुलींनी दूध प्यायलाच पाहिजे हा आईचा अट्टाहास असतो. तो पूर्ण करण्यासाठी मग आई मुलांसाठी बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या पावडर आणतात.

ओव्हरथिंकिंगची सवयच लागली? आलिया भटच्या फिटनेस ट्रेनर सांगतात नकारात्मकता कमी करण्याचा उपाय

या पावडर दूधात टाकल्या की दूधाला छान सुवास आणि रंग येतो आणि मग मुलं अगदी ग्लास- ग्लास दूध मटकावून टाकतात. पण या पावडर मुलांच्या आरोग्यासाठी अजिबातच चांगल्या नाहीत. त्यांच्यामध्ये साखरेचं, चॉकलेटचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे त्या मुलांसाठी अतिशय हानिकारक आहेत. यामुळे दात किडणे, लठ्ठपणा वाढणे, प्री- डायबेटिक स्टेज असे त्रास मुलांमध्ये दिसून येतात.

 

मुलांसाठी दूधात टाकायच्या ज्या पावडर असतात त्यावर हेल्थ ड्रिंक असा शब्द असतो. पण वास्तवात मुलांसाठी हेल्दी असं त्यात काही नसतं.

टरबूज नेहमीच उरतं, मग ते किती तासांत संपवावं आणि फ्रिजमध्ये कसं ठेवावं? पाहा २ टिप्स

त्यामुळे Food Safety and Standards Authority of India यांनी दिलेल्या आदेशानुसार नुकतेच उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने Hindustan Unilever यांच्या एका उत्पादनातून 'healthy drinks' हा उल्लेख काढायला सांगितला आहे. त्यानुसार बदल करत आता कंपनीने हॉर्लिक्स या त्यांच्या उत्पादनातून हेल्थ ड्रिंक वगळून फंक्शनल न्यूट्रिशनल ड्रिंक असा उल्लेख केला आहे. ग्राहकांना त्या उत्पादनाबाबत अधिक स्पष्टता यावी, हा यामागचा उद्देश आहे. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलहान मुलंदूधपालकत्व