Join us   

आठवड्याभराचा थकवा ५ मिनिटात घालवतील 'हे' इफेक्टीव्ह उपाय; कायम फ्रेश, उत्साही वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 3:52 PM

Health remove weeks fatigue : सततच्या कामामुळे शरीराला लवकर थकवा जाणवू लागतो. शरीराला ऊर्जावान बनवण्यासाठी मसाजचा वापर केला जाऊ शकतो.

आठवडाभर सतत ऑफिसचं काम, टेंशन आणि   कुटुंबाची जबाबदारी यात  लोक इतके बिझी होतात की त्यांना आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करावं लागत. अशात थकवा, अशक्तपणा वाढत जातो.  थकव्यामुळे अनेकदा शारीरिक समस्या, झोप पूर्ण न होणं ताण-तणाव, चिंता डिप्रेशन उद्भवते. थकवा दूर करण्यासठी ओव्हर द काऊंटर औषधांचा वापर केला जातो. पण नैसर्गिक उपायांचा वापर केल्यास कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून येणार नाहीत. अशाच काही घरगुती उपायांबद्दल समजून घेऊया. (Health remove weeks fatigue in minutes adopt this easy home remedy)

हळद

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, थकवा दूर करण्यासाठी हळदीची निवड केली जाऊ शकते. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, एक संयुग जे मधुमेह, न्यूरोपॅथी आणि सायटिका यासह अनेक परिस्थितींमुळे होणारे वेदना आणि थकवा कमी करू शकते. हळदीच्या चहामध्ये काळी मिरी मिसळून प्यायल्याने आराम मिळतो.

हिट थेरेपी

मान, पाठ आणि पाय यांच्या स्नायूंना आराम देण्यासाठी हीट थेरपीचा अवलंब केला जाऊ शकतो. पोटावर गरम पाण्याची बाटली किंवा हीटिंग पॅड वापरणे शरीराचा थकवा कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. काही वेळा स्नायूंच्या दुखण्यामुळे थकवाही येऊ लागतो. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा कमी होतो.

रोज घासूनही दात पिवळट दिसतात; २० रूपयात मिळवा पांढरेशुभ्र दात, हा घ्या आयुर्वेदीक उपाय

कोल्ड थेरेपी

कधीकधी शरीरात सूज आणि वेदना देखील थकवा वाढवते. कोल्ड थेरपी किंवा कोल्ड शॉवरचा वापर थकवा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. उन्हाळ्याच्या हंगामात, थंड शॉवरने काही मिनिटांत थकवा दूर केला जाऊ शकतो. याव्यतिरिक्त, ते सूज आणि वेदना देखील कमी करू शकते.

मसाज

सततच्या कामामुळे शरीराला लवकर थकवा जाणवू लागतो. शरीराला ऊर्जावान बनवण्यासाठी मसाज केली जाते.  मसाज शरीराच्या स्नायूंना आराम देण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी कार्य करते. थकवा दूर करण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. अधिक समस्या असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य