धूळीचे कण, बॅक्टेरिया तयार होण्यापासून बचाव करण्यासाठी शरीरात कफ तयार होतात. रेस्पिरेटरी सिस्टिम म्हणजे श्वसन संस्थेद्वारे यावर नियंत्रण ठेवले जाते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कफ वाढला तर त्याला अनेक समस्या येऊ लागतात. वाढलेल्या कफमुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. यासह सतत खोकला आणि नाक वाहण्याची समस्या देखील उद्भवते. कोरोना विषाणू प्रथम या श्वसन प्रणालीवर हल्ला करतो, ज्यामुळे शरीरात कफ वाढू लागतात.
आपल्या रोजच्या आहारात असे काही पदार्थ आहेत. जे शरीरातील कफचे प्रमाण वाढवतात. त्यांच्या अतिसेवनामुळे कफ वाढला तर त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याचा धोका देखील वाढतो. म्हणूनच, तज्ञांचा असा विश्वास आहे की कोरोनाचा वाढता धोका पाहता, आपण या पदार्थांचे सेवन कमी केलं पाहिजे, जेणेकरून कफ वाढणार नाही आणि आपले शरीर व्हायरसशी लढण्यासाठी तयार राहील
फळं आणि भाज्या
फळं आणि भाज्यांमध्ये पोषक घटक नैसर्गिकरित्या आढळतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात. परंतु यापैकी काही पदार्थ मर्यादित प्रमाणात वापरणेच ठीक आहे. बटाटे, कोबी, केळी, कॉर्न आणि कॉर्नपासून बनवलेली इतर उत्पादने आपल्या फुफ्फुसातील कफचं प्रमाण वाढवू शकतात.
ब्रेकफास्ट
ब्रेकफास्टमध्ये खाल्ले जाणारे काही पदार्थ जसे की ब्रेड, पास्ता, तृणधान्ये, अंडी, दही, लोणी, चीज आणि आइस्क्रीम देखील फुफ्फुसातील कफचं प्रमाण वाढवतात. म्हणून, आपण त्यांचे प्रमाण कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे. नेहमी नाष्त्याला तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा बदल करावा.
पेय पदार्थ
कफ वाढवण्याच्या दृष्टीने काही पेय पदार्थ तुमच्यासाठी धोकादायक देखील असू शकतात. साधारणपणे, चहा, कॉफी, सोडा आणि अल्कोहोलचे सेवन जास्त प्रमाणात घेणं आपल्या शरीरासाठी घातक मानले जाते. ही सर्व पेयं शरीरातील कफ वाढवतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती कमी करतात परिणामी इन्फेक्शनचा धोका वाढतो.
जर तुम्हाला वर नमूद केलेल्या गोष्टींचे सेवन थांबवायचे असेल किंवा कमी खायचे असेल नक्की सुरूवात करू शकता. यामुळे तुमच्या शरीरात कफ तयार होण्याचा धोका कमी होईल. असे काही पदार्थ आहेत, जे शरीरातील वाढलेले कफ कमी करण्यास मदत करतात.
काय खायचं?
व्हिटॅमिन सी समृध्द सर्व लिंबूवर्गीय फळे तुमच्या शरीरातील कफ कमी करतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. म्हणून, आपण संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरी या पदार्थांचा आहारात समावेश करावा. या व्यतिरिक्त, भरपूर हिरव्या भाज्या, पालेभाज्या, टोमॅटो भरपूर खा कारण त्यांच्यामध्ये एंटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे श्वसनमार्ग व्यवस्थित करण्याचे कार्य करतात.
भरपूर पाणी प्या
या पदार्थांचे सेवन करण्याव्यतिरिक्त कफ वाढण्यापासून रोखण्याचा सर्वात सोपा, सर्वात प्रभावी आणि किफायतशीर मार्ग म्हणजे भरपूर पाणी पिणे. पाणी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. यासह, साचलेल्या कफला द्रव बनवून ते हळूहळू वेगवेगळ्या मार्गांनी शरीराबाहेर फेकते. म्हणून भरपूर पाणी पिण्याची सवय तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.