(Image Credit- emedicinehealth.com)
रोज सकाळी उठल्यानंतर पेय पदार्थाचं सेवन करून अनेकजण आपल्या दिवसाची सुरूवात करतात. काहीजण चहा, कॉफी पितात. तर अनेकजण वजन कमी करण्यासाठी मध, लिंबू घालून पाणी पितात. कोमट पाणी, चहा, कॉफी, हॉट चॉकलेट आणि कोमट दूध ही सर्व लोकप्रिय पेये आहेत. या पदार्थांच्या सेवनानं लोकांना दिवसाची सुरुवात करायला आवडते. याशिवाय रोज सकाळी तुम्ही मिठाच्या पाण्याचे सेवन केले तर शरीराला भरपूर फायदे मिळू शकतात.
१) त्वचेसाठी फायदेशीर
मिठाचं पाणी त्वचेशी निगडीत आजारांशी लढण्यासाठी प्रभावी ठरते. यामुळे त्वचेवर ग्लोईंग आणि रेडीएंट लूक मिळण्यास मदत होते. याच्या सेवानानं त्वचेवरील रॅशेस, स्किन इन्फेक्शन, खाजेपासून आराम मिळतो. मिठातील सल्फर एक्ने, पिंपल्सच्या समस्येशी लढण्यास मदत करतात
२) वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते
रोज सकाळी तुम्ही मिठाच्या पाण्याचे सेवन केले तर तुम्हाला तब्येतीत बदल जाणवले. यातील खनिजांमुळे भूक कमी लागते. याव्यतिरिक्त, ते आतड्यांमधील कोलन रिकामे करते. ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात. याशिवाय वाढतं वजनही नियंत्रणात राहते.
३) चांगली झोप
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही झोपेचा त्रास असेल तर दररोज सकाळी हिमालयीन मीठाच्या पाण्याचा वापर करा. यामुळे निद्रानाशाची समस्या दूर होईल. यातील गुणधर्म स्लिप हॉर्मोनच्या चांगल्या कार्यासाठी फायदेशीर ठरतात.
४) हाडांसाठी फायदेशीर
चांगल्या हाडांसाठी कॅल्शियम आणि मिनरल्सची गरज असते. मिठाच्या पाण्यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमरता भरून निघण्यास मदत होते. यामुळे ऑस्टिओपॅरेसिससारख्या हाडांच्या आजारापासून लांब राहता येतं.
५) शरीर डिटॉक्स होते
मिठाच्या पाण्यात एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. यामुळे रक्त शुद्धीकरणात मदत होते. शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी घटक बाहेर निघण्यासाठी रोज सकाळी मीठाचं पाणी पिणं लाभदायक ठरतं.
६) डिहायड्रेशन होत नाही
पाणी पिणं चांगल्या आरोग्यासाठी किती महत्वाचं असतं याची तुम्हाला कल्पना असेलच. मिठाच्या पाण्यानं शरीर हायड्रेट राहण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. याशिवाय मिठाच्या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया चांगली होते. मिठाचे पाणी आपल्या शरीरातील पोषक घटकांची कमी देखील दूर करते.