Join us   

Health Tips : कमकुवत लिव्हरचे संकेत असू शकते तोंडाला येणारी दुर्गंधी; ६ लक्षणांनी वेळीच ओळखा गंभीर समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 1:51 PM

Health Tips : आपल्या शरीरातील हानीकारक पदार्थ बाहेर काढण्यासाठी कार्य करते. कमकुवत लिव्हरमुळे (Liver Weakness) शरीराला वेगवेगळ्या प्रकारे नुकसान पोहोचू शकते.

ठळक मुद्दे लिव्हरच्या आजाराची सुरूवात लक्षणं ओळखणं फार महत्वाचं आहे. तरच गंभीर आजार होण्यापासून रोखता येऊ शकतं.चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आपले लिव्हर कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर डाग किंवा पुरळ दिसतात.

लिव्हर शरीरातील महत्वपूर्ण अवयवांपैकी एक आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी लिव्हरची महत्वाची भूमिका असते. पोटातील हा लहानसा अवयव खराब झाल्यास आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. लिव्हर आपल्या शरीरातील हानीकारक पदार्थ बाहेर काढण्यासाठी कार्य करते. कमकुवत लिव्हरमुळे (Liver Weakness) शरीराला वेगवेगळ्या प्रकारे नुकसान पोहोचू शकते. लिव्हरच्या आजाराची सुरूवात लक्षणं ओळखणं फार महत्वाचं आहे. तरच गंभीर आजार होण्यापासून रोखता येऊ शकतं.

कमकुवत लिव्हरची लक्षणं

त्वचेच्या समस्या

चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे आपले लिव्हर कमकुवत होऊ लागते, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर डाग किंवा पुरळ दिसतात. यकृत कमकुवत झाल्यामुळे किंवा त्यात कोणत्याही प्रकारची बिघाड झाल्यामुळे, शरीरात एस्ट्रोजेन आणि टायरोनेसचे प्रमाण वाढते, ज्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग दिसू लागतात.

तोंडातून वास येणं

जर तुमच्या तोंडात सतत वासाची समस्या असेल तर ते लिव्हर निकामी होण्याचे किंवा कमकुवत होण्याचे लक्षण असू शकते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या. असे केल्याने तुमच्या तोंडाला वास येणार नाही. खरं तर, जेव्हा सिरोसिसची  (Cirrhosis) समस्या असते, त्यावेळी रक्तात असलेल्या डायमिथाइल सल्फाइडमुळे  (Dimethyl sulfide)देखील असे होते.

त्वचेवर निळ्या रेषा

जर तुमचे लिव्हर कमकुवत झाले असेल किंवा त्यात कोणत्याही प्रकारचा दोष असेल, लिव्हर योग्यरित्या कार्य करत नसेल तर कोळ्याच्या जाळ्यासारख्या निळ्या रेषा तुमच्या त्वचेवर तयार होऊ लागतील. शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढल्यामुळे हे देखील होते. म्हणून, जेव्हा तुम्हाला असे वाटते की त्वचेवर निळ्या रेषा उमटू लागल्या आहेत, तेव्हा त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

खाज येणं

कोणत्याही हंगामात विशेषतः पावसाळ्यात खाज सुटणे सामान्य मानले जाते आणि अनेकदा आपण किरकोळ समस्या म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु जर खाज कायम राहिली तर ते लिव्हरच्या कमजोरीचे लक्षण असू शकते यामागील कारण म्हणजे जेव्हा लिव्हरमध्ये  तयार होणारा पित्त रस आपल्या रक्तात विरघळू लागतो, तेव्हा हा रस त्वचेखाली जमा होतो आणि खाज सुटण्याची समस्या सुरू होते.

हातांचे तळवे लाल होणं

जर तुमचे तळवे नेहमी लाल होत असतील किंवा खाज सुटण्याची  समस्या येत असेल तर समजून घ्या की तुमचे  लिव्हर कमकुवत होऊ लागले आहे. म्हणून लक्षणं दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू करायला हवेत. 

जखम झाल्यानंतर जास्त रक्त बाहेर येणं

जर किरकोळ दुखापतीमुळे तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागातून भरपूर रक्तस्त्राव होत असेल तर याचा अर्थ तुमचे लिव्हर कमकुवत झाले आहे. बऱ्याचदा तुमच्या लक्षात आले असेल की एखादी जखम झाल्यास रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. रक्त गोठण्यासाठी विशेष प्रथिनांची आवश्यकता असते आणि ते यकृतात तयार होते. ज्यामुळे रक्तस्त्राव थांबतो. जेव्हा तुमचे यकृत कमकुवत होते, तेव्हा ते रक्त गोठण्याच्या कामात व्यत्यय आणते, ज्यामुळे अधिक रक्तस्त्राव होतो.

टॅग्स : हेल्थ टिप्स