आजकाल आपलं लाईफस्टाईल इतकं बदललं आहे, की त्यामुळे कमी वयातच अनेक आजार आपल्याला जडतात. एकतर अभ्यास, करिअर या सगळ्यांमध्ये टिकून राहण्यासाठी असणारं प्रचंड टेन्शन आणि दुसरं म्हणजे बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि जंकफूड, फास्टफूड खाण्याचं वाढलेलं परिणाम. या सगळ्याचा मिळून व्हायचा तोच परिणाम होतो आणि कमी वयातच अनेक आजार मागे लागतात. सध्या तरुण वयातच अनेक जणांना hypertension किंवा High Blood pressure चा त्रास जाणवत आहे.. हा त्रास कमी करण्यासाठीच अभिनेत्री भाग्यश्रीने (Actress Bhagyashree) एक सोपा घरगुती उपाय सुचविला आहे. (home remedies)
बीपी, मधुमेह असे त्रास असले की डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण गोळ्या- औषधी घेत असतो. पण तरीही घरच्याघरी काही सोपे घरगुती उपायही आपण करून बघतो. हा पण असाच एक उपाय आहे. तुमच्या नियमित औषधी चालू ठेवा. त्यात अजिबात खंड नकोच.. पण त्यासोबतच हा एक सोपा उपायही करून बघायला काही हरकत नाही. भाग्यश्रीने हा उपाय तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये भाग्यश्री म्हणते की भारतात दर ४ लोकांमागे एका जणाला बीपीचा त्रास असतो. एवढं या आजाराचं प्रमाण वाढलं आहे. बीपीचा त्रास मागे लागण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ताण- तणाव.. नियमितपणे व्यायाम करणं, मेडिटेशन, योगा यामुळे बीपीचा त्रास निश्चितच कमी होऊ शकतो. त्यामुळे ते उपाय तर कराच, पण एक दिवसाआड बीटरूटचा ज्यूसदेखील प्या असा सल्लाही भाग्यश्रीने दिला आहे.(beet root juice to control BP)
कसा करायचा बीटरूट ज्यूस?
- बीटरूट ज्यूस करण्यासाठी अर्धे बीट घ्या. स्वच्छ धुवून त्याची सालं काढून टाका.
- त्याच्या बारीक फोडी करून मिक्सरमध्ये टाका. त्यात पुदिन्याची ८ ते १० पाने आणि १ ग्लास पाणी घाला.
- हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. त्यानंतर गाळून घ्या आणि त्याचा रस वेगळा काढा.
- आता या ज्यूसमध्ये अर्धे लिंबू पिळून टाका. चिमूटभर काळे मीठ, मिरेपूड आणि जीरे पावडर टाका.
- सगळे मिश्रण व्यवस्थित हलवा. एकदम थंडगार ज्यूस हवा असेल तर त्यात बर्फाचा तुकडा टाका आणि गारेगार बीटरूट ज्यूस प्या.
बीट खाण्याचे फायदे (health benefits of beetroot)
- बीटमध्ये कॅलरी आणि फॅट अतिशय कमी असते. त्यामुळे बीट जसे बीपीच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे, तसेच वेटलॉस करणाऱ्यासांठीही उपयुक्त आहे.
- बीटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे अशक्तपणा घालविण्यासाठी बीट उत्तम आहे.