Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सर्दी, खोकला झाल्यावर भात खायचा की नाही? लवकर बरं होण्यासाठी 'असा' घ्या आहार

सर्दी, खोकला झाल्यावर भात खायचा की नाही? लवकर बरं होण्यासाठी 'असा' घ्या आहार

Health Tips : थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला आणि अनेक विषाणूजन्य समस्यांचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे या दिवसांत खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 01:40 PM2022-01-30T13:40:58+5:302022-01-30T13:57:42+5:30

Health Tips : थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला आणि अनेक विषाणूजन्य समस्यांचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे या दिवसांत खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प

Health Tips : Can eating rice during the cold and cough be harmful lets find out | सर्दी, खोकला झाल्यावर भात खायचा की नाही? लवकर बरं होण्यासाठी 'असा' घ्या आहार

सर्दी, खोकला झाल्यावर भात खायचा की नाही? लवकर बरं होण्यासाठी 'असा' घ्या आहार

भारतीय लोकांची पहिली पसंती भात आहे. भात जरी जगाच्या अनेक भागात खाल्ले जात असला तरी भारतात सर्वाधिक भात खाल्ला जातो. यामुळेच बहुतेक भारतीय घरांमध्ये रोज भात बनवला जातो. (Diet for cough and cold) भाताला स्वतःची खास चव नसली तरी डाळ किंवा भाजीसोबत खाल्ल्याने त्याची चव वाढते. तसे, बरेच लोक म्हणतात की सर्दी आणि खोकल्यामध्ये भात खाऊ नये. विशेषतः हा प्रश्न अशा लोकांना सतावतो, जे रोज चपातीऐवजी भात खाणे पसंत करतात.(Can eating rice during the cold and cough be harmful lets find out)

वास्तविक,   थंडीच्या दिवसात सर्दी, खोकला आणि अनेक विषाणूजन्य समस्यांचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळे या दिवसांत खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पण लोकांना सर्दी-खोकला झाला की सर्दी-खोकल्यात भात खाणे योग्य आहे की नाही हे अनेकदा कळत नाही. भात खाण्याबाबत जर तुमच्या मनात हा संभ्रम कायम असेल  तर जाणून घ्या यात किती तथ्य आहे.

कफ, खोकला झाल्यावर भात का खाऊ नये? (Can I eat rice during flu?)

निसर्गोपचार आणि आयुर्वेदिक शास्त्रानुसार तांदळात कफ  निर्माण करणारे गुणधर्म असतात. ज्याप्रमाणे केळी कफ तयार करण्यास कारणीभूत ठरतात, त्याचप्रमाणे तांदूळ देखील तुमच्या शरीराचे तापमान थंड ठेवते. यामुळेच सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असताना नेहमी कोमट पेय पिण्याचा आणि खाण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्यात भात खाल्ल्याने कफ बाहेर पडतो असे अनेकदा ऐकायला मिळते.

भातामुळे तयार होणारा कफ आणि खोकला शरीराला अशक्त बनवतो. यामुळेच तज्ज्ञ हिवाळ्यात भात न खाण्याचा सल्ला देतात. शिळा किंवा थंड भात शरीराला थंड ठेवतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. सर्दी किंवा खोकला असताना शिळा भात खाल्ल्याने बरं होण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे हिवाळ्यात थंड किंवा शिळा भात खाणे शक्यतो टाळावे.

डॉक्टर भात न खाण्याचा सल्ला देतात हे फार कमी वेळा घडते. तांदूळ थंड असल्याने आणि त्यात कफ तयार करण्याचे गुणधर्म असल्याने, ते तुमची सर्दी-खोकल्याची समस्या आणखी वाढवू शकते. इतकंच नाही तर आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होण्यासही ते कारणीभूत आहे. त्यामुळे सर्दी-खोकला किंवा घशाचा संसर्ग झाल्यास डॉक्टर भात, दही, मसालेदार पदार्थ, केळी इत्यादी टाळण्यास सांगतात.

Web Title: Health Tips : Can eating rice during the cold and cough be harmful lets find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.