Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मोठ्यानं हसल्यावर, शिंकल्यावर युरीन लिकेज होते? महिलांना हा त्रास होण्याची कारणं आणि घरगुती उपाय!

मोठ्यानं हसल्यावर, शिंकल्यावर युरीन लिकेज होते? महिलांना हा त्रास होण्याची कारणं आणि घरगुती उपाय!

Health Tips: युरीन लिकेजचा त्रास पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त प्रमाणात होतो, पण काळजीचे कारण नाही, सोप्या उपायांनी हा त्रास बरा करता येतो. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2025 15:35 IST2025-01-11T15:01:03+5:302025-01-11T15:35:06+5:30

Health Tips: युरीन लिकेजचा त्रास पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त प्रमाणात होतो, पण काळजीचे कारण नाही, सोप्या उपायांनी हा त्रास बरा करता येतो. 

Health Tips: Do you experience urine leakage when you laugh or sneeze? Know the reason and home remedies! | मोठ्यानं हसल्यावर, शिंकल्यावर युरीन लिकेज होते? महिलांना हा त्रास होण्याची कारणं आणि घरगुती उपाय!

मोठ्यानं हसल्यावर, शिंकल्यावर युरीन लिकेज होते? महिलांना हा त्रास होण्याची कारणं आणि घरगुती उपाय!

युरीन लिकेज अर्थात लघवीवर नियंत्रण न राहणे. ही समस्या स्त्री पुरुषांमध्ये सामान्य आहे. मात्र स्त्रियांमध्ये ते प्रमाण जास्त असते. पण असे का? त्याची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊ आणि त्यावर उपाय कोणते तेही पाहू. 

शिंक आली, खोकला आला, ठसका लागला, जोरात हसलो तरी अनेकांना लघवीवर नियंत्रण सुटून कपडे ओले होण्याची भीती असते आणि तसे होतेही. पूर्णच नियंत्रण सुटले नाही तरी थोड्याफार प्रमाणात लिकेज होते आणि त्यामुळे कपड्याना ओल राहते, वास येतो आणि त्या ओलेपणामुळे वारंवार लघवी होते. 

लघवीतील असंयम म्हणजे व्यक्तीची इच्छा नसतानाही शरीरात साठलेले द्रव्य लघवीवाटे पटकन बाहेर पडते. त्यालाच युरीन लिकेज (Urine Leakage Problem)  म्हणतात.मूत्राशयात लघवी साठण्याची नैसर्गिक प्रक्रिया होत असते, जेव्हा मूत्राशय भरू लागते तेव्हा ते रिकामे करण्यासाठी आपण लघवीला जातो. मात्र काही कारणाने लघवी थांबवून ठेवली, तर हसता, शिंकता, खोकता लघवी पोटावर दाब येऊन बाहेर पडते. कारण लघवीच्या ठिकाणी असलेले स्नायू कमकुवत होतात आणि नियंत्रण सुटते. 

महिलांच्या बाबतीत इतर कारणे : (Urine Leakage Causes)

>>वाढत्या वयाबरोबर महिलांमध्ये हा आजार सामान्यपणे उद्भवतो. ही समस्या तिशी ओलांडलेल्या बहुतेक सर्व महिलांमध्ये दिसून येते.
>> बाळाच्या प्रसूतीनंतर, अनेक स्त्रियांच्या शरीराच्या खालच्या भागाचे स्नायू कमकुवत होतात, कारण बाळाच्या जन्माच्या वेळी ते स्नायू अधिक ताणले जातात. 
>> याशिवाय लठ्ठपणा आणि मधुमेहामुळेही ही समस्या सुरू होते. 
>>ही समस्या जास्त प्रमाणात कॉफी पिणाऱ्या किंवा धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये उद्भवू शकते.

युरीन लिकेज उपचार : (Urine Leakage Remedy)

>> लघवीशी संबंधित स्नायू, ज्याला पेल्विक बोन म्हणतात,  फ्लोअर एक्ससाईज म्हटले जाते. त्याचे व्यायाम करणे हितावह ठरते. इंटरनेटवर त्याचे अनेक  व्हिडीओ उपलब्ध आहेत. ते पाहून सराव करता येईल. 

>> या व्यायाम प्रकाराने लघवी नियंत्रणात येण्यास मदत होते आणि स्नायूंना बळकटी मिळते, शिथिलता नष्ट होते. 

>> लघवी अडवून ठेवणे शरीराला त्रासदायक ठरू शकते, त्यामुळे लघवी लागल्यावर पुढच्या पाच मिनिटात जाऊन आल्यानेदेखील हा त्रास कमी होतो. 

>> दोन ते तीन कपांपेक्षा जास्त चहा, कॉफी पीत असाल तर ते प्रमाण कमी करा. त्रास आटोक्यात येईल. 

>> लघवी नियंत्रणात येईपर्यंत पॅंटी लायनर नावाचे प्रोडक्ट वापरावे. ज्यामुळे थोडीशी ओल सोशून घेतली जाते आणि कपडे व त्वचा कोरडी राहण्यास मदत मिळते. 

>> ज्यांना हा त्रास जास्त प्रमाणात होतो त्यांनी डॉक्टरांकडून तपासून घेणे केव्हाही चांगले. डॉक्टर त्यावर उपयुक्त औषध देतात आणि गरज पडल्यास छोटीशी शस्त्रक्रिया देखील सुचवतात. 

त्यामुळे शरीराच्या या छोट्याशा तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका, भविष्यात त्याचे स्वरूप मोठे होऊ शकते, त्यामुळे वेळीच काळजी घ्या. 

Web Title: Health Tips: Do you experience urine leakage when you laugh or sneeze? Know the reason and home remedies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.