Join us   

तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं? वाचा डॉक्टरांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2024 5:54 PM

Important Tips For Using Copper Utensils: तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी कसं धोकादायक ठरू शकतं, याविषयी डॉक्टरांनी दिलेला हा महत्त्वाचा सल्ला बघा...

ठळक मुद्दे तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी बाजारात मिळणारे केमिकल्स वापरण्याऐवजी चिंचेचा कोळ, लिंबू- मीठ असे घरगुती साहित्य वापरा.

तांब्याची भांडी आपल्याकडे फार पुर्वीपासून वापरली जातात. मध्यंतरीच्या काळात ही भांडी थोडी मागे पडली. पण आता पुन्हा एकदा मागच्या काही वर्षांपासून तांब्याची भांडी ट्रेण्डमध्ये आली आहेत. तांब्याच्या भांड्यात भरून ठेवलेलं पाणी दररोज प्यायल्याने आरोग्याला किती लाभ होऊ शकतात, ते ही आपण जाणतो. त्यामुळेच तर आता अनेक घरांमध्ये तांब्याची पाण्यासाठीची वेगवेगळी भांडी, ग्लास आणि अगदी तांब्याची बाटलीही दिसू लागली आहे. पण हीच भांडी कधी कधी आरोग्यासाठी अतिशय घातकही ठरू शकतात, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ते नेमकं कसं ते पाहा...(doctor says drinking water from copper utensils can make you sick)

 

तांब्याची भांडी वापरताना कोणती काळजी घ्यायची?

तांब्याची भांडी वापरताना कोणती काळजी घ्यायची याविषयीचा व्हिडिओ डॉ. पुर्वी भट यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की चुकीच्या पद्धतीने तुम्ही तांब्याची भांडी वापरली तर त्यामुळे आरोग्याला खूप नुकसान होऊ शकतं.

पातेल्यात पातेलं, वाटीत वाटी अडकली? २ सोपे उपाय- जोर न लावताही करा चटकन वेगळे

त्यामुळे तांब्याची भांडी जर काळपट पडली असतील तर अशा भांड्यांमधलं पाणी पिऊ नका. तसेच नेहमी उत्तम दर्जाचीच तांब्याची भांडी विकत घ्या. तांब्याच्या भांड्यातून दही, ताक, सरबत असे ॲसिडिक पदार्थ कधीही घेऊ नका.

 

तांब्याची भांडी कशी स्वच्छ करायची?

अस्वच्छ असलेल्या तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायलं तर नक्कीच वेगवेगळे आजार तुम्हाला होऊ शकतात. पोटदुखी, उलट्या, मळमळ, अन्नावरची वासना उडणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा येणे, निळसर हिरव्या रंगाची चिकट शौचास होणे, खूप जास्त तहान लागणे असा त्रास होऊ शकतो.

मुलांना शाळेसाठी स्टीलचा डबा घ्यायचा? बघा ३ स्वस्त पर्याय, अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत

कधी कधी तर लिव्हर किंवा किडनीच्या आरोग्यासाठीही ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे तांब्याची भांडी वापरण्यापुर्वी ती पुर्णपणे स्वच्छ आहेत, याची खात्री करून घ्या. तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी बाजारात मिळणारे केमिकल्स वापरण्याऐवजी चिंचेचा कोळ, लिंबू- मीठ असे घरगुती साहित्य वापरा. स्वच्छ, चकाचक तांब्याची भांडी आरोग्यासाठी लाभदायक ठरता, हे लक्षात असू द्या. 

 

टॅग्स : आरोग्यस्वच्छता टिप्सहेल्थ टिप्सकिचन टिप्स