Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ऑक्टोबर हिटमुळे व्हायरल इन्फेक्शन झालं? ४ गोष्टी अजिबात विसरु नका, ऊन बाधण्याचा त्रास गंभीर

ऑक्टोबर हिटमुळे व्हायरल इन्फेक्शन झालं? ४ गोष्टी अजिबात विसरु नका, ऊन बाधण्याचा त्रास गंभीर

Health tips for How To Take care in October Heat : सणावारांचा आनंद घेता यावा यासाठी वेळीच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2023 03:00 PM2023-10-09T15:00:15+5:302023-10-09T19:13:32+5:30

Health tips for How To Take care in October Heat : सणावारांचा आनंद घेता यावा यासाठी वेळीच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली..

Health tips for How To Take care in October Heat : Remember 4 things to avoid October hit; The heat of the sun will not hurt | ऑक्टोबर हिटमुळे व्हायरल इन्फेक्शन झालं? ४ गोष्टी अजिबात विसरु नका, ऊन बाधण्याचा त्रास गंभीर

ऑक्टोबर हिटमुळे व्हायरल इन्फेक्शन झालं? ४ गोष्टी अजिबात विसरु नका, ऊन बाधण्याचा त्रास गंभीर

गणपती संपून नवरात्रीची चाहूल लागते आणि गरम व्हायलाही सुरुवात होते. पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मधला काळ म्हणजे ऑक्टोबर हिट. गरमीने नको नको करणारा हा कालावधी म्हणजे अतिशय कोरडा, घामाघूम करणारा आणि नकोसा. या काळात दिवसा कडक ऊन असते आणि रात्री आणि सकाळी हवेत एकप्रकारचा गारवा असतो. पावसाळ्याकडून हिवाळ्याकडे जाताना अशी बदललेली हवा म्हणजे आरोग्याच्या तक्रारी वाढण्याचीच शक्यता जास्त. अशावेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास ही ऑक्टोबर हिट बाधत नाही आणि तब्येत चांगली राहण्यास मदत होते. डेंगी, सर्दी-खोकला, व्हायरल इन्फेक्शन्स अशा विविध समस्या या काळात डोकं वर काढतात. मग सणावारांचा आनंद लुटण्याच्या या काळात आपण मात्र गोळ्या-औषधं घेत एका कोपऱ्यात झोपून राहतो. पण असे होऊ नये आणि ऑक्टोबर हिटचा त्रास होऊ नये यासाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे (Health tips for How To Take care in October Heat). 

१. आजारी असताना घराबाहेर पडणे टाळा

साधा फ्लू आहे म्हणून आपण अनेकदा दुखणं अंगावर काढतो. फ्लूमुळे आधीच थकवा आलेला असतो आणि त्यातच बाहेर पडलात तर हा थकवा कमी होण्याऐवजी वाढत जातो. अशावेळी घरात थांबणे, हलका आहार घेणे आणि जास्तीत जास्त आराम करणे हा लवकर बरे होण्यासाठी उत्तम उपाय आहे हे लक्षात घ्या. 

(Image : Google )
(Image : Google )

२. डीहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या

कोणत्याही आजारात जास्तीत जास्त पाणी पिणे हा उत्तम उपाय असतो. डिहायड्रेशनमुळे रिकव्हरी व्हायला वेळ लागू शकतो. त्यामुळे दर काही वेळाने पाणी किंवा सरबत, ओआरएस असे पेय प्यावे. तुम्ही दिवसातून किमान २ लिटर पाणी पित आहात याची खात्री करा. तसेच चहा, कॉफी यांसारखी पेय जास्त प्रमाणात प्यायल्याने तुम्हाला डिहायड्रेशनचा जास्त त्रास होऊ शकतो, त्यामुळे कमीत कमी चहा-कॉफी घ्या.

३. आहाराकडे लक्ष द्यायला हवे

हलका आणि सहज पचेल असा आहार घ्या. यामध्ये मऊसर खिचडी, वरण-भात, पेज, सूप यांसारख्या आहाराचा समावेश असावा. आजारपणात आपली विशेष हालचाल होत नसल्याने अन्न पचत नाही. अशावेळी जड आहार घेतला तर तो पचण्यास अवघड होतो. त्यामुळे जंक फूड, तळलेले, मसालेदार पदार्थ न घेता हलका आहार घेतलेला केव्हाही चांगला.

(Image : Google )
(Image : Google )

४. उपचारांना टाळाटाळ नको

आपल्याला आलेला ताप किंवा सर्दी-खोकला आरामाने बरा होईल असे म्हणून औषधे घेणे टाळू नका. बरेच जण डॉक्टरांकडे न जाता मेडिकल स्टोअरमधून औषधे आणतात, असे करणे तोट्याचे ठरु शकते. डॉक्टर लक्षणांवरुन औषधे देत असतात, त्यामुळे वेळीच त्यांच्याकडे जाऊन योग्य ती औषधे घ्या. फ्लू हा वरवर साधा वाटणारा आजार असला तरीही त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे फ्लू आहे म्हणून नुसतेच पडून न राहता योग्य ती काळजी घेऊन औषधोपचार वेळेत सुरु करणे महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या.


 

Web Title: Health tips for How To Take care in October Heat : Remember 4 things to avoid October hit; The heat of the sun will not hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.