Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हामुळे डिहायड्रेशन होतंय हे सांगणारी ५ लक्षणं, ३ उपाय करा चटकन

उन्हामुळे डिहायड्रेशन होतंय हे सांगणारी ५ लक्षणं, ३ उपाय करा चटकन

Health Tips : डिहायड्रेशन हा शब्द एकच असला तरी त्याची लक्षणं किंवा त्यामुळे होणारे त्रास हे वेगवेगळ्या स्वरुपाचे असतात. त्यावर योग्य उपचार करायचे असतील, तर आपल्याला होतो आहे, तो त्रास डिहायड्रेशनचाच आहे, हे ओळखता यायलाच हवं.. (summer special)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 02:16 PM2022-03-26T14:16:34+5:302022-03-26T14:17:32+5:30

Health Tips : डिहायड्रेशन हा शब्द एकच असला तरी त्याची लक्षणं किंवा त्यामुळे होणारे त्रास हे वेगवेगळ्या स्वरुपाचे असतात. त्यावर योग्य उपचार करायचे असतील, तर आपल्याला होतो आहे, तो त्रास डिहायड्रेशनचाच आहे, हे ओळखता यायलाच हवं.. (summer special)

Health Tips for Summer: Dont neglect these 7 symptoms of dehydration in summer. Read how to prevent dehydration | उन्हामुळे डिहायड्रेशन होतंय हे सांगणारी ५ लक्षणं, ३ उपाय करा चटकन

उन्हामुळे डिहायड्रेशन होतंय हे सांगणारी ५ लक्षणं, ३ उपाय करा चटकन

Highlights वेळीच उपचार केले नाही, तर डिहायड्रेशनचा त्रासही वाढतो आणि धोकादायक ठरू शकतो.

उन्हाचा पारा वाढू लागलाय तसा हळूहळू आता उष्णतेचा त्रास होणं सुरू झालं आहे. मार्च महिन्यातच उकाड्याने (health care in summer) अनेक जण हैराण झाले आहेत. ऊन लागून ताप येणं, अशक्तपणा, जेवण न जाणं हे त्रास अनेक जणांना उन्हामुळे सुरू होतात. यासोबतच सुरू होणारा एक महत्त्वाचा त्रास म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन होणारं डिहायड्रेशन. वेळीच उपचार केले नाही, तर डिहायड्रेशनचा त्रासही वाढतो आणि धोकादायक ठरू शकतो. (how to prevent dehydration in summer)

 

डिहायड्रेशन म्हणजे नेमकं काय (What is dehydration)
डिहायड्रेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं, हा प्रश्न अनेक जणांना पडतो. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर उन्हाळ्यात घाम येण्याचं प्रमाण खूप वाढतं. काही कारणांमुळे पाणीही कमी प्यायल्या जातं. त्यामुळे मग हळूहळू शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते. पाणी पातळी कमी झाली की आपोआपच शरीरातील खनिजे, सोडियम, साखर, अत्यावश्यक जीवनसत्त्वे संपूर्ण शरीरात पोहोचत नाहीत आणि त्यांची कमतरता निर्माण होते. तसेच पाणी कमी झाल्याने शरीरातील विषारी द्रव्येही शरीराबाहेर फेकली जात नाहीत. याचा एकत्रित परिणाम होतो आणि वेगवेगळ्या स्वरूपांत डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागतो.

 

डिहायड्रेशनची लक्षणे (symptoms of dehydration)
- खूप आणि सतत डोकं दुखणे
- आळस येणे, सतत झोपावं वाटणे 
- लघवीला जाण्याचे प्रमाण कमी होणे.
- लघवीचा रंग पिवळा असणे.
- चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे.
- तोंड कोरडे पडणे
- अन्नावरची वासना उडणे
- त्वचा निस्तेज होणे.

 

डिहायड्रेशन झाल्यावर काय उपचार कराल? (home remedies for dehydration)
१. डिहायड्रेशन झाल्यावर पाणी पातळी वाढविणे गरजेचे असते. पण नुसतंच पाणी पिण्यापेक्षा लिंबाचं सरबत, ग्लुकोज, फळांपासून घरी तयार केलेली सरबते असं लिक्विड डाएट अधिक वाढवावं.
२. संत्री, मोसंबी, किवी, टरबूज, खरबूज, द्राक्ष अशी पाणी जास्त असणारी फळं जास्तीतजास्त खावीत.
३. रोजच्या जेवणात दही किंवा ताक आवर्जून घ्यावे. 

 

Web Title: Health Tips for Summer: Dont neglect these 7 symptoms of dehydration in summer. Read how to prevent dehydration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.