Join us   

Health Tips : ...कॅन्सरचं कारण ठरू शकतात त्वचेवरच्या निळ्या खुणा; डॉक्टरांनी सांगितली कारणं अन् उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 3:07 PM

Health Tips : ब्रूसेज  विविध प्रकार आहेत आणि त्यांचा रंगही त्यांच्या कारणावर अवलंबून असतो. काहींचा रंग काळा असू शकतो, तर काहींचा रंग लाल, निळा, जांभळा आणि पिवळा असू शकतो.

एखाद्या ठिकाणी पडल्यानंतर किंवा मार लागल्यानंतर त्वचेचा काही भाग हा निळा झालेला दिसून येतो. त्याला ब्रूसेज (Bruises) असं म्हणतात.  निळ्या रंगाच्या टिश्यूंना नुकसान पोहोचल्यानं या जखमा होतात. यामुळे त्वचेच्या वरचा भाग थोड्याफार प्रमाणात बदलतो. अग्रिम इंस्टीट्यूट ऑफ न्यूरोसाइंसचे चीफ ऑफ न्यूरोलॉजी एंड को-चीफ स्ट्रोक, डॉक्टर सुमित यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना सांगितले की हे डाग अशावेळी दिसतात जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या डॅमेज होतात. परिणामी टिश्यूजच्या खाली रक्त जमा होणं सुरू होतं. 

ब्रूसेज  विविध प्रकार आहेत आणि त्यांचा रंगही त्यांच्या कारणावर अवलंबून असतो. काहींचा रंग काळा असू शकतो, तर काहींचा रंग लाल, निळा, जांभळा आणि पिवळा असू शकतो. जेव्हा ब्रुसेज खूप हलका असतो तेव्हा तुम्हाला हे सर्व रंग पाहायला मिळू शकतात. कधी कधी कारण नसताना ब्रुसेज स्वतःहून येतात. त्यामागे गंभीर कारण असू शकते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायद्याचं ठरतं.

कारणं

कॅन्सर

सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये नाही, पण काही कॅन्सरमध्ये शरीरावर निळे डाग असू शकतात. यातील उदाहरणांमध्ये बोन मॅरो कॅन्सरचा  समावेश होतो, ज्याला ल्युकेमिया देखील म्हणतात. जे लोक ल्युकेमियाशी झुंज देत आहेत, त्यांच्या शरीरात पुरेसे प्लेटलेट्स तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांना अशा निळ्या खुणा पाहायला मिळतात. 

ब्लीडिंग डिसऑर्डर 

रक्तस्त्राव विकार हे निळ्या गुठळ्या दिसण्याचे मुख्य कारण मानले जाते. ज्यामध्ये अशा परिस्थितींचा एक गट असतो ज्यामध्ये रक्त गोठत नाही किंवा खूप हळू बनते. यापैकी काही उदाहरणांमध्ये वॉन विएल ब्रँड आणि हिमोफोलिया यांचा समावेश आहे. या प्रकारच्या परिस्थितींचा तुमच्या रक्तप्रवाहावर आणि गुठळ्या होण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हा आजार प्रथिनांच्या कमतरतेमुळे होऊ शकतो.

व्हिटामीन के आणि सी

जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर स्कर्वी सारखी स्थिती दिसू शकते. त्याच्या लक्षणांमध्ये हिरड्यांमधून रक्त येणे, निळे ठसे, तेही विनाकारण आणि जखमा इत्यादी दिसतात. व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्यात  घट होऊ शकते, ज्यामुळे सतत रक्तस्त्राव होतो. यामुळे तुमच्या शरीरावर कुठेही निळ्या रंगाचे डाग दिसू शकतात.

दारूचं अधिक सेवन

जर तुम्ही जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन केले तर तुम्हाला यकृताशी संबंधित समस्या दिसू लागतात. जेव्हा ही समस्या मोठी होते, तेव्हा ते प्रोटीन बनवण्याची तुमच्या यकृताची क्षमता कमकुवत होते. जे रक्त गोठण्यासाठी आवश्यक आहे. यामुळे तुमच्या शरीरात जास्त रक्तस्राव होऊ लागतो ज्यामुळे निळे डाग येऊ शकतात.

औषधांचे सेवन

जर तुम्ही एस्पिरिन सारखी औषधे घेत असाल ज्याने तुमचे रक्त पातळ होते. यामुळे, रक्त गोठण्यास असमर्थता दिसून येते. त्यामुळे नील वगैरेच्या खुणा असू शकतात. तुम्हाला या लक्षणाने त्रास होत असल्यास, तुम्ही तुमच्या औषधांमध्ये बदल करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी बोलू शकता. विनाकारण निळ्या खुणा दिसल्या तर लगेच डॉक्टरांकडे जा आणि कारण शोधा. जेणेकरून आपण अधिक गंभीर परिस्थिती टाळू शकता.

टॅग्स : हेल्थ टिप्सकर्करोग