शरीरात व्हिटामीन, मिनरल्सची कमतरता असल्यास नकळत तब्येतीचे अनेक त्रास उद्भवतात. अनेकदा महागडे ड्राय फ्रुट्स बजेट बाहेर असतात ज्यामुळे नक्की खावं तेच कळत नाही. (How to Eat Peanuts For Protine) ड्राय फ्रुट्सचा आपल्या आहारात समावेश केल्यास शरीर मजबूत होईल आणि शरीरातील पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होईल. १० ते २० रूपयांत मूठभर शेंगदाणे खाल्ल्यास तुम्हाला भरपूर पोषण मिळेल. पिस्ता, बदाम काजूऐवजी तुम्ही या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. (Health Tips Groundnut Cheap Source Of Protein)
प्रोटीनचा भंडार आहेत शेंगदाणे
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडीसिनच्या रिपोर्टनुसार शेंगदाण्यांमध्ये व्हिटामीन ए, व्हिटामीन बी, सी, ई, जिंक आणि फॉस्फरेस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, व्हिटामीन बी-१६, व्हिटामीन बी-१२, फॉलिक एसिड, ओमेगा ६ फॅटी एसिड्स यांसारखी पोषक तत्व असतात. तुम्ही दिवसाला १०० ग्राम शेंगदाणे खाल्ले तर तुम्हाला त्यातून १० ते १५ ग्राम प्रोटीन मिळेल. शरीरासाठी हा उत्तम पर्याय आहे.
शेंगदाण्यांचे सेवन केल्याने शरीराची इम्यूनिटी स्ट्राँग राहते. यातील मिनरल्स चेहऱ्यावर चमक आणतात. हाडं मजबूत होतात कारण यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. शेंगदाणे खाण्याचे योग्य प्रमाण माहीत असायला हवं. एक्सपर्ट्स सांगतात की शेंगदाणे कच्चे खाणं टाळायला हवं. थोड्या फार प्रमाणात तुम्ही शेंगदाण्यांचे सेवन करू शकता. रात्री पाण्यात भिजवून सकाळी सालं काढून शेंगदाण्यांचे सेवन करा.
शेंगदाणे किती प्रमाणात कसे खावेत?
शेंगदाण्याच्या सालीत काही प्रमाणात टॉक्सिन्स असतात ८ तास पाण्यात ठेवल्यामुळे त्यातील फॅट्स बाहेर निघतात. दिवसाला १०० ग्रामपेक्षा जास्त शेंगदाणे खाऊ नका अन्यथा अपचन, गॅस, एसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. शेंगदाण्यांचे सेवन तब्येतीसाठी गुणकारी ठरते. साईटिफीक रिसर्चनुसार शेंगदाण्यांच्या माध्यमातून तुम्ही फायटोस्टेरॉलचे सेवन करू शकता, प्रोस्टेट ट्यूमरचा धोका ४० टक्क्यांनी कमी होते.
शरीराच्या इतर भागांमध्ये पसरणाऱ्या कॅन्सरचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो. शेंगदाण्यांना उर्जेचा पॉवर पॅक असंही म्हणतात. यात जवळपास ५० टक्के हेल्दी फॅट्स असतात. पारंपारीक खाद्यपदार्थांच्या तुलनेत यात अधिक कॅलरीज असतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला अधिक उर्जा मिळते.