पावसाळ्यात अनेकांना छातीत कफ साचण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. आपलं शरीर पित्त, वात, कफ दोषांपासून तयार झालेले असते. याला त्रिदोष असंही म्हटलं जातं. शरीरात त्रिदोषांचे संतुलन राहणं गरजेचं आहे. यातील एक दोष असुंलित असेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. कफ शरीरातील इतर दोषांच्या तुलनेत संथ असतो. कफ दोषामुळे शरीरात सुस्ती, नकारात्मकता, थकवा वाटणं अशी लक्षणं दिसून येतात. शरीरात कफाचा स्तर वाढल्यानंतर पचनतंत्रावर परिणाम होतो. लठ्ठपणा आणि अस्थमा वाढण्याचं हेच कारण ठरू शकतं. शरीरातील कफ दोष कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय वापरायला हवेत.
कफ काय असतो?
आयुर्वेदात कफ दोषाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा दोष अत्यंत उपयुक्त मानला जातो. कफ दोष हा मुख्य दोष मानला जातो, कारण तो इतर दोन दोष, वात आणि पित्त यांचाही समतोल राखतो. असंतुलित जीवनशैली आणि वाईट खाण्याच्या सवयींमुळे शरीरात कफ दोष वाढतो. रोगांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी, कफ दोष संतुलित ठेवणे फार महत्वाचे आहे.
कफ वाढण्याचे कारण
तेलकट पदार्थ जास्त खाल्ल्यानं छातीत कफ जमा होतात. म्हणून बाहेरचं खाणं, खारटं पदार्थ, कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करू नये. अनेकदा लोक खूप थंड पाणी पितात किंवा पावसात भिजल्यामुळे शरीरात कफचे प्रमाण वाढू शकते. ओव्हरईटिंग केल्यानंही शरीरात अधिक प्रमाणात कॅलरीज जमा होतात. ज्यामुळे कफ दोष वाढतात. दूध, दही आणि तूप जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरातील कफचे प्रमाण वाढते. म्हणून दूग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन करू नका.
शरीरातील कफ वाढण्याची लक्षणं
जेव्हा शरीरात कफ वाढतो तेव्हा तुम्ही त्याची लक्षणे सहज ओळखू शकता.
नेहमी सुस्त आणि थकल्यासारखे वाटणे
त्वचा पिवळसर होणे
मूत्र समस्या
मानसिक थकवा जाणवणे.
कफ कमी करण्याचे घरगुती उपाय
तिखट आणि कडवट पदार्थांचे सेवन करा
आयुर्वेदानुसार, तिखट अन्नपदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील कफ संतुलित होतो. कफचा त्रास असलेल्या लोकांनी नक्कीच तिखट पदार्थांचे सेवन केले पाहिजे. ज्या लोकांना कफ वाढल्यामुळे कोणतीही समस्या उद्भवते त्यांनी आपल्या आहारात मसालेदार गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्ही गुळवेळाच्या लहान काड्या, पानं यांचं डॉक्टरांच्या सल्ल्यानं सेवन करू शकता.
व्यायाम करणं
या दोषांचे संतुलन राखण्यासाठी व्यायाम हा एक अतिशय प्रभावी पर्याय मानला जातो. कफ कमी करण्यासठी व्यायाम आवश्यक आहे. शरीर संतुलित ठेवण्यासाठी आपल्याला धनुरासन, भुजंगासन, उस्तासन आणि सूर्यनमस्कार इत्यादी व्यायाम आवश्यक आहे. हे लक्षात ठेवा की हे व्यायाम करताना तुम्हाला श्वासाचे संतुलन सुरळीत ठेवावे लागेल.
मधाचे सेवन
कफाचा समतोल साधण्यासाठी प्राचीन काळापासून मध हा आयुर्वेदात वापरला जात आहे. यासाठी तुम्हाला जुन्या मधाचे सेवन करावे लागेल. लक्षात ठेवा की जर तुम्ही कफ संतुलित करण्यासाठी मध घेत असाल तर ते गरम पाण्यासह घेऊ नका. तुम्ही ते साध्या पाण्यात मिसळून पिऊ शकता किंवा आपण मध कोरडे खाऊ शकता.
संतुलित आहार घ्या
जास्त जंक फूड खाल्ल्यामुळे शरीरात कफचे प्रमाण वाढते. कफ जास्त असणारे लोक लठ्ठपणाला बळी पडतात. म्हणून, कफ दोष संतुलित करण्यासाठी चांगला, संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. यासाठी उपवास देखील खूप फायदेशीर मानला जातो. कफ दोष कमी करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा उपवास करू शकता. यामुळे कफ दोष कमी होतो.