Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Health Tips : एकच बेडशीट किती दिवस वापरता? खूप दिवस बेडशीट बदलली नाही तर काय होतं? वेळीच तब्येत सांभाळा

Health Tips : एकच बेडशीट किती दिवस वापरता? खूप दिवस बेडशीट बदलली नाही तर काय होतं? वेळीच तब्येत सांभाळा

Health Tips : रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्यासह, त्वचेच्या संक्रमणाला कारणीभूत ठरू शकते महिनोंमहिने बेडशीट न बदलण्याची सवय.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 01:29 PM2022-01-05T13:29:44+5:302022-01-05T13:53:09+5:30

Health Tips : रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्यासह, त्वचेच्या संक्रमणाला कारणीभूत ठरू शकते महिनोंमहिने बेडशीट न बदलण्याची सवय.

Health Tips : How many days should the bedsheet be changed most of the people do not know the reason behind this | Health Tips : एकच बेडशीट किती दिवस वापरता? खूप दिवस बेडशीट बदलली नाही तर काय होतं? वेळीच तब्येत सांभाळा

Health Tips : एकच बेडशीट किती दिवस वापरता? खूप दिवस बेडशीट बदलली नाही तर काय होतं? वेळीच तब्येत सांभाळा

आपण सर्वजण आपापल्या घरात बेडवर चादर नक्कीच घालतो. बेडशीटमुळे खोलीचे सौंदर्य वाढते, पण जेव्हा स्वच्छतेचा विचार केला जातो तेव्हा बेडशीटकडे फार कमी लोक लक्ष देतात. बहुतेक लोक घरात पडलेली बेडशीट अस्वच्छ दिसल्यावर बदलतात किंवा खोलीत काही बदल करून बदलतात. खरं तर आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की ही अस्वच्छ चादर आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. (How many days should the bedsheet be changed most of the people do not know)

तुम्हाला कल्पनाही नसेल पण  दीर्घकाळ एकाच बेडशीटमध्ये राहिल्याने तुमची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि तुम्हाला मोसमी रोग, श्वसनाचे आजार, STD आणि एलर्जी होण्याची शक्यता आहे. झोपेशी संबंधित समस्या देखील होऊ शकतात. खरंतर, बऱ्याच वेळानंतरही आपल्याला हे कळत नाही की गेल्या आठवड्यात पलंगावर ठेवलेल्या चादरीत अनेक गोष्टी जमा होत आहेत ज्या आपण पाहू शकत नाही जसे की मृत पेशी, धूळ, तेल आणि अशा इतर गोष्टी ज्या आपल्याला कालांतराने आजारी बनवू शकतात.

3-4 आठवड्यात  चादरी धुणे योग्य आहे का?

साधारणपणे 3-4 आठवड्यातून एकदा चादरी धुतल्या जातात. तज्ज्ञांच्यामते असं करणं योग्य नाही.  यामुळे पुरळ, ऍलर्जी, एक्जिमा, दमा, सर्दी आणि फ्लू पासून झोपेची गुणवत्ता कमी होण्यापर्यंत अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. एका मीडिया रिपोर्टनुसार, न्यूमोनिया आणि गोनोरियाशी संबंधित बॅक्टेरिया तुमच्‍या पलंगावर 7 दिवसात वाढू शकतात. याच कारणामुळे तुम्ही चादरी स्वच्छ ठेवायला हव्यात. 

महिनोंमहिने एकच बेडशिट वापरल्यावर काय होतं?

एका संशोधनादरम्यान, सेव्हिल युनिव्हर्सिटीच्या जीवशास्त्र विभागाने सूक्ष्मदर्शकाखाली 4 आठवडे न धुतलेल्या  चादरी पाहिल्या. नमुने तपासले गेले आणि त्यात बॅक्टेरॉईड्स आढळून आले, ज्यांचा निमोनिया, गोनोरिया आणि अॅपेन्डिसाइटिसशी संबंध आहे. तज्ज्ञ विभागाला फुसोबॅक्टेरिया देखील सापडला, जे घशाच्या संक्रमणासाठी कारणीभूत ठरते.  लेमायर सिंड्रोम आणि निसेरिया गोनोरियाचे कारण ठरू शकते.

किती दिवसांनी बेडशिट बदलायची?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की प्रत्येकाने दर आठवड्याला आपली चादर धुवावी, जरी ती चादर आपल्याला स्पष्टपणे स्वच्छ दिसत असली तरीही. हे शक्य नसल्यास, दर 2 आठवड्यांनी किमान एकदा चादर धुवावी लागेल. कारण आपले शरीर दररोज 40,000 डेड  स्किन  सोडते, ज्यामध्ये बरेच वाईट बॅक्टेरिया असतात जे आपल्या आरोग्यावर, प्रतिकारशक्तीवर आणि झोपेवर परिणाम करू शकतात.

Web Title: Health Tips : How many days should the bedsheet be changed most of the people do not know the reason behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.